Posts

दयाळ

Image
इतर मराठी नावं : डोमिंगा, सुईणबुड्डी, खोडाकुशी, वट्टी, कोडामल्ली  सध्याचं इंग्रजी नाव : Oriental Magpie Robin (ओरिएंटल मॅगपाय रॉबिन)  आधीची इंग्रजी नावं : Dayal (दयाल), Magpie Robin (मॅगपाय रॉबिन)  शास्त्रीय नाव : Copsychus saularis (कॉपसिकस सॉलॅरिस)  लांबी : २३ सें.मी.  आकार : बुलबुलापेक्षा मोठा            सरसरत उंच गेलेल्या गगनजाईच्या हिरव्या मनोऱ्याच्या टोकाशी बसून 'उस्ताद दयाल खाँ' गाणं गात असतात. एका मागून एक गोड सुरांच्या माळाच त्यांच्या कंठातून बाहेर पडत असतात. या गवयाची गाण्याची बैठक पक्की ठरलेली असते. त्यामुळे अपॉइंटमेंट घेतल्यासारखं त्याला पुन्हा पुन्हा पाहता येतं. पक्ष्यांमधला सुप्रसिद्ध गायक श्याम (White - rumped Shama) , a (Indian Robin) tror ferfert (Black Redstart) यांच्या फॅमिलीतल्या दयाळाची ओळख पटवणं अगदी सोपं आहे. नर काळाकुळकुळीत आणि पोटाशी पांढरा शुभ्र, तर मादी राखाडी रंगाची असते. परसबागा, उद्यानं, फळबागा, आमराया, गावखेड्यांच्या आसपासचा झाडझाडोरा आणि पानगळीचं जंगल हा त्याचा अधिवास आहे. दयाळ हा एक सहजपणे दिसणारा स्...

दयाळ

Image
इतर मराठी नावं : डोमिंगा, सुईणबुड्डी, खोडाकुशी, वट्टी, कोडामल्ली  सध्याचं इंग्रजी नाव : Oriental Magpie Robin (ओरिएंटल मॅगपाय रॉबिन)  आधीची इंग्रजी नावं : Dayal (दयाल), Magpie Robin (मॅगपाय रॉबिन)  शास्त्रीय नाव : Copsychus saularis (कॉपसिकस सॉलॅरिस)  लांबी : २३ सें.मी.  आकार : बुलबुलापेक्षा मोठा            सरसरत उंच गेलेल्या गगनजाईच्या हिरव्या मनोऱ्याच्या टोकाशी बसून 'उस्ताद दयाल खाँ' गाणं गात असतात. एका मागून एक गोड सुरांच्या माळाच त्यांच्या कंठातून बाहेर पडत असतात. या गवयाची गाण्याची बैठक पक्की ठरलेली असते. त्यामुळे अपॉइंटमेंट घेतल्यासारखं त्याला पुन्हा पुन्हा पाहता येतं. पक्ष्यांमधला सुप्रसिद्ध गायक श्याम (White - rumped Shama) , a (Indian Robin) tror ferfert (Black Redstart) यांच्या फॅमिलीतल्या दयाळाची ओळख पटवणं अगदी सोपं आहे. नर काळाकुळकुळीत आणि पोटाशी पांढरा शुभ्र, तर मादी राखाडी रंगाची असते. परसबागा, उद्यानं, फळबागा, आमराया, गावखेड्यांच्या आसपासचा झाडझाडोरा आणि पानगळीचं जंगल हा त्याचा अधिवास आहे. दयाळ हा एक सहजपणे दिसणारा स्...

राखी धनेश

Image
इतर मराठी नावं : शिंगोरा , शिंगचोचा , धनचिडी , धनेरा , भिणस , धनछडी  इंग्रजी नाव : Indian Grey Hornbill ( इंडियन ग्रे हॉर्नबिल )  शास्त्रीय नाव : Ocyceros birostris ( ओसिरॉस बायरॉस्ट्रिस )  लांबी : ६१ सें.मी.  आकार : घारीएवढा . हा पक्षी त्याच्या धुरकट राखाडी रंगामुळे आणि चोचीच्या विशिष्ट आकारामुळे चटकन ओळखता येतो. त्याच्या चोचीवर शिंगासारखा दिसणारा (Casque) एक अवयव असतो. याची शेपटी लांब असते. हे पक्षी पानझडीच्या जंगलात, शेतांच्या आसपास असलेल्या मोठ्या झाडांवर, फळबागांमध्ये आणि शहरातील वडा-पिंपळासारख्या वृक्षांवर दिसतात. धनेश हा नेहमीच झाडांवर राहणारा पक्षी आहे. झाडांची फळं खाण्याबरोबरच तो किडे, पाली, गांधीलमाश्या, छोटे उंदीरसुद्धा खातो. जोडीने फिरणारे हे पक्षी विणीच्या हंगामात म्हणजे मार्च ते जून या महिन्यात घरटं करण्यासाठी झाडांच्या ढोल्या शोधू लागतात.विणीची वेळ जवळ आली की मादी ढोलीत जाऊन बसते. बाहेरच्या बाजूने नराने आणून दिलेल्या चिखलाचा आणि स्वतःच्या विष्ठेचा उपयोग करून ती ढोलीचं तोंड बंद करते आणि फक्त चोच बाहेर काढता येईल एवढीच फट ठेवते. या कामात चोचीचा उपयोग...

जंगल मैना

Image
इंग्रजी नाव : Jungle Myna (जंगल मैना)  शास्त्रीय नाव : Acridotheres fuscus (अक्रिडोथिरिस फ्युस्कस)  लांबी : २३ सें.मी.  आकार :   साळुंकीएवढा                                 नाव 'जंगल' मैना असलं, तरी हा पक्षी दाट लोकवस्तीतही दिसत. एके काळी मनुष्यवस्तीपासून दूर शेत - शिवारांमध्ये किंवा गायरानांमध्ये चरणाऱ्या जनावरांच्या पायांमधून ठुमकणारी ही मैना आता गजबजलेल्या शहरांच्या परिघात दिसू लागली आहे; घरटी करून आपली प्रजा वाढवू लागली आहे. साळुकीशी (Common Myna) तुलना करता तिची संख्या कमी आहे परंतु शहरी जीवन तिच्या अंगवळणी पडू लागलं आहे. साळुकीच्या पावलावर पाऊल ठेवून ती आता एखाद्या कचरापेटीच्या आसपास उड्या मारताना दिसते. एखाद्या शहरातल्या आधुनिक वसाहतीपेक्षा जुन्या भागाशी, पेठांशी अधिक जवळीक करणाऱ्या मैनेला अशा ठिकाणी घरटी करण्यासाठी अधिक जागा उपलब्ध होतात. भाताची शेती, जंगलांच्या जवळ असणारी लहान - मोठी गावं, जंगलपट्ट्यांमधील मोकळ्या जागा आणि शहरांच्या पंचक्रोशी या अधिवासात दिसणारा पक्ष...

भांगपाडी मैना

Image
इतर मराठी नावं : ब्राह्मणी मैना , पोपई मैना , काळ्या डोक्याची मैना , काळटोप मैना , शंकरा , कवरी.  सध्याचं इंग्रजी नाव : Brahminy Starling ( ब्रहमिनी स्टार्लिंग )   शास्त्रीय नाव : Sturnus pagodarum ( स्टर्नस पॅगोडॅरम )  लांबी : २१ सें.मी.  आकार : साळुंकी पेक्षा लहान                       चापूनचोपून भांग पाडावा तशी डोक्यापासून मानेपर्यंत रूळणारी काळ्या रंगाची सैलसर पिसं असलेली ही मैना, जंगल मैना आणि  साळुंकी  या सहजपणे दिसणाऱ्या मैनांपेक्षा आकाराने लहान आहे. पानझडीचं विरळ जंगल, झुडपी रान, काटवन, शेतं, बागा, उद्यानं, आमराया, नद्या आणि तलावांच्या काठांवरचे हिरवळीचे तुकडे, गायरानं अशा ठिकाणी ही मैना तिच्या विशिष्ट तोऱ्यात चालताना, फिरताना दिसते .  साळुंकी प्रमाणे हा पक्षी मोठ्याथव्यांनी दिसत नाही . तो पुष्कळदा जोडीने किंवा छोट्या गटांमध्ये दिसतो . या पक्ष्याची एक सवय आहे . जमिनीवर उतरून खाद्य शोधता शोधता पक्षी जर मध्येच थांबले, तर मादी नराच्या किंचित जवळ जाते. लगट करणाऱ्या मादीला बघू...

जांभळा शिंजीर Purple Sunbird (Nectarinia asiatica)

Image
इतर मराठी नावं : जांभळा सूर्यपक्षी , चुमका , मधुकर  इंग्रजी नाव : Purple Sunbird (पर्पल सनबर्ड)  शास्त्रीय नाव : Nectarinia asiatica ( नेक्टरिनिया एशियाटिका )  लांबी : १० सें.मी.  आकार : चिमणीपेक्षा लहान  जांभळा शिंजीर नर  जांभळा शिंजीर मादी            शहरं - नगरांमध्ये राहणारा, नाजूक चिवचिवाट करणारा जांभळा शिंजीर, दूर मोकळ्या रानातही दिसतो. कमालीचा चंचल आणि चपळ असा हा चिमुकला पक्षी पहिल्यांदा साध्या डोळ्यांनी शोधून नंतर दुर्बिणीत पकडायचा म्हणजे घामटा निघतो. तपशीलवार निरीक्षण करणं ही फार पुढची गोष्ट झाली. वसंतात रानपांगारा ( Wild Coral Tree ) फुलला की हा जांभळा ' ठिपका ' मधुरसाची मेजवानी झोडायला झाडावर येतो. पातळ , बाकदार आणि टोकदार चोच आणि जिभेची नळी वापरून मकरंद चोखून घेतो. मधूनच लहर फिरली की मान उंचावून हवेवर एक लांबलचक चिवचिवाटी तान सोडून देतो. ' चि - चि - चि - चि - चि - चिविक् -चिविक् - चिविक् -चिविक् - चिरी - चिक् -चिक् चिक् - चिक् ! आपण सूर्याकडे पाठ करून पाहत असलो, तर पक्ष्याच्या अंगाव्द पडलेल्या उन्हात एक...

शिंपी Common Tailorbird (Orthotomus sutorius)

Image
शिंपीइतर मराठी नावं : लिचकूर , चिवळ  इंग्रजी नाव : Common Tailorbird ( कॉमन टेलरबर्ड )  शास्त्रीय नाव : Orthotomus sutorius ( ऑर्थोटोमस सुटोरियस )  लांबी : १३ सें.मी.  आकार : चिमणीपेक्षा लहान            सुगरण पक्ष्याच्या खालोखाल नजाकतदार, उत्कृष्ट घरटं बांधणारा वास्तुशिल्पी म्हणजे हा शिंपी पक्षी. हा पक्षी छोट्या चणीचा आणि हिरव्या रंगाचा असतो. त्याच्या डोक्यावर तांबूस तपकिरी रंगाची टोपी असून पोटाकडची बाजू पांढरी असते. किडे पकडण्यासाठी आणि पानांना टाके घालून घरटं शिवण्यासाठी योग्य अशी त्याची चोच अतिशय टोकदार असते. शिंपी पक्षी कमी उंचीच्या झाडाझुडपांमध्ये किडे शोधत हिंडत असतात. या पक्ष्याचं मुख्य अन्न म्हणजे झुरळं, मुंग्या, उडणारे किडे, अळ्या वगैरे. वसंत ऋतूत जेव्हा पांगारा, पळस आणि काटेसावरीसारखे वृक्ष फुलतात तेव्हा फुलांमधला मकरंद पिण्यासाठी याझाडांवर शिंप्याचा फेरा होतो. तेव्हा त्याच्या डोक्याच्या पिसांना परागकण चिकटतात आणि पर्यायाने परागीभवनास मदत होते. शिंपी हा एक धीट पक्षी आहे. शुष्क, पानझडीच्या जंगलातून तसेच खेड्यापाड्यांतून आणि ...

शिक्रा Shikra (Accipiter badius)

Image
इतर मराठी नावं : शिक्रा ( मादी ), चीपक किंवा चिपका ( नर ), शिकारा  इंग्रजी नाव : Shikra ( शिक्रा )  शास्त्रीय नाव : Accipiter badius ( अक्सिपीटर बॅडियस )  लांबी : ३० ते ३६ सें.मी.  आकार : गावकावळ्यापेक्षा लहान              याचं इंग्रजी नाव इतकं रूळलंय की, याला शिक्रा  म्हणूनच ओळखतात. ' शिक्रा ' हा उर्दू भाषेतून घेतलेला पर्शियन शब्द आहे. त्याचा हिंदी भाषेतील अर्थ शिकारी असा आहे. हा एका जातीचा शिकारी पक्षी आहे. शिकारी पक्षी म्हणजे जिवंत भक्ष्याची शिकार करणारा. पानझडीचं जंगल, खेड्यापाड्यांच्या आसपास असणाऱ्या आंब्याच्या बागा आणि शेतीच्या प्रदेशात शिक्रा दिसतो. पुष्कळदा हा पक्षी आपल्याला प्रत्यक्ष दिसण्याआधी पक्ष्यांनी त्याला हेरलेलं असतं. बुलबुल, सातभाई, वेडे राघू, साळुक्या, पारवे हे पक्षी शिळ्याची चाहूल लागताच घाबरून उडायला लागतात किंवा बसल्या जागेवरूनच भराभर इशारेवजा आवाज काढतात. अशा वेळी जर आसपास नीट लक्ष देऊन पाहिलं, तर कधी गोलाकार पंखांची उघडझाप करत तर कधी संथपणे तरंगत येणारा शिक्रा दिसतो.तीक्ष्ण नजर, बाकदार चोच आणि धारदा...

साळुंकी Common Myna (Acridotheres tristis)

Image
इतर मराठी नावं : शाळू, लांडी  इंग्रजी नाव : Common Myna ( कॉमन मैना )  शास्त्रीय नाव : Acridotheres tristis ( अक्रिडोथिरिस ट्रिस्टिस )  लांबी : २२.५ सें.मी.  आकार  : कबुतरापेक्षा लहान            काळाच्या ओघात माणसाशी मैत्री करणाऱ्या कावळा - चिमणीसारखीच ही साळुकी. डोळ्यांभोवतीच्या पिवळ्याजद कातडीमुळे साळुकी पटकन ओळखता येते. शेतकऱ्यांच्या नांगरामागे किंवा माळावर गाईगुरांच्या पायांमधून ठुमकत चालणारी आणि किडेमकोडे टिपणारी साळुकी धिटाईने एखाद्या बंगल्याच्या आवारातही येते. गहू, ज्वारी, तूर आणि डाळिंबावरच्या उंट अळीचा समाचार घेत शेतकऱ्यांना मदत करते. थव्यांनी राहणारा हा पक्षी पळस, पांगारा, काटेसावर ही झाडं फुलली की मधुरसासाठी या झाडांना हमखास भेट देतो. ऐन उन्हाळ्यात दुपारी साळुकी एखाद्या झाडावर विश्रांती घेण्यासाठी बसते आणि स्वगत म्हटल्यासारखे ढंगदार आवाज काढते.' क्रो - क्रो - क्रो - क्रो ! चॉ - चॉ - चाँ - चाँ ! ट्रॅची - ट्रॅची - ट्रॅची ! ' दोन साळुक्या एकमेकींच्या शेजारी बसलेल्या असताना जर एकीला उडायचं असेल तर ती ' पिळलॉक ! ' असा गोड ...

सुभग Common lora (Aegithina tiphia)

Image
दुसरं मराठी नाव : कमका बोदल इंग्रजी नाव : Common lora ( कॉमन आयोरा )  शास्त्रीय नाव : Aegithina tiphia ( एगीथिना टिफिया )  लांबी : १४ सें.मी.  आकार : चिमणीएवढा            हा एक छोटासा सुंदर पक्षी आहे. पाठीकडून काळ्या आणि पोटाकडून पिवळ्या रंगाच्या सुभगाच्या पंखावर दोन पांढरे पट्टे असतात. शेपटी काळी असते. मुख्यतः झाडावर राहणारा हा पक्षी अळ्या, कीटक आणि कोळी खातो. पानझडीच्या जंगलात, शहरातील भरपूर झाडं असलेल्या भागांमध्ये, आंबा, चिंच, कडुनिंबाच्या उपवनांमध्ये सुभगाची वेड लावणारी शीळ ऐकू येते. सरासरी पाऊसमान ३०० मिलिमीटर असलेल्या रखरखीत प्रदेशातही सुभग दिसतो. शेतांच्या बांधावर लावलेल्या आणि परिसरात उगवून आलेल्या बाभूळ, शेवगा, कडुनिंब ,हादगा, चिंच, बोर, आंबा अशा झाडांच्या हिरव्या पुंजक्यांमध्ये सुभगाला आपली जागा सापडते. विणीच्या हंगामात मादीला आकर्षित करण्यासाठी आणि परिसरातल्या इतर नरांना इशारा देण्यासाठी सुभगाचा नर एक प्रकारचा संकेत ( Courtship Display ). अशा वेळी तो पाठीवरच्या पांढऱ्या शुभ्र पिसांचा गोंडा फुलवून पंखांची जलद फडफड करत सरळ रेषेत ...

वेडा राघू Green Bee-eater (Merops orientalis)

Image
इतर मराठी नावं : बहिरा पोपट, तेलंगी, पतेरी, पातूर, पतरिंगा, पानरागो, कंगन  सध्याचं इंग्रजी नाव : Green Bee-eater ( ग्रीन बी-ईटर )  आधीचं इंग्रजी नाव : Small Green Bee-eater ( स्मॉल ग्रीन बी-ईटर )  शास्त्रीय नाव : Merops orientalis ( मेरॉप्स ओरिएंटॅलिस )  लांबी : १६ ते १८ सें.मी.  आकार : चिमणीएवढा Add caption            एखादया बाभळीच्या झाडाच्या फांदीवरून हवेत झेप घेणारा, उडणाऱ्या किड्याच्या हालचालीबरहुकूम उलटसुलट गिरक्या घेणारा आणि किडा पकडताच पंख पसरून संथपणे तरंगत पुन्हा त्याच फांदीवर येऊन बसणारा वेडा राघू रानोमाळ फिरणाऱ्या  पोरांना  चांगलाच माहीत असतो. त्याला ते ' भैरा पोपट  ' या नावाने ओळखतात. शेतीवाडी, चराऊमाळरानं, विरळ जंगलं ही ते आढळण्याची मुख्य ठिकाणं, हिरव्या रंगाच्या या सुंदर पक्ष्याच्या शेपटीमधली दोनच पिसं जास्त लांब असतात. या पिसांचा निम्मा भाग नाजूक तारांसारखा दिसतो. हे पक्षी जोडीने किंवा लहान थव्यांनी विजेच्या तारा, कुंपणावर, झाडाच्या फांद्यांवर बसून आपली शिकार टिपण्यात दंग असतात. हवेत झेपावत एखादा ...

पिंगळा Spotted Owlet (Athene brama)

Image
इतर मराठी नावं : घोगड, घोघो पिंजरा, पिंजरला, पिंजल  इंग्रजी नाव : Spotted Owlet (स्पॉटेड आऊलेट)  शास्त्रीय नाव : Athene brama  लांबी : २१ सें.मी.  आकार : साधारण साळुंखीएवढा            राखट - तपकिरी अंगावर पांढरे ठिपके असणारं हे एक छोटं घुबड आहे. घुबडांना दिवाभीत किंवा दिवांध असंही म्हणतात. पिंगळ्याला साधारण सपाट चेहऱ्यावर समोरच्या बाजूला खूप मोठे, वाटोळे डोळे असतात. याचा मुख्य फायदा असा की त्यामुळे त्याला अंतराचं ज्ञान अचूक होतं. दुसऱ्या कोणत्याही पक्ष्यापेक्षा घुबडाची व्दिनेत्री  दृष्टी ( Binocular Vision ) अधिक व्यापक असते. जिवंत भक्ष्य पकडत असल्यामुळे त्यांच्या दृष्टीने व्दिनेत्री  दृष्टीचं महत्त्व अनन्यसाधारण असतं. बाजूचं किंवा मागचं बघण्यासाठी घुबडं गर्रकन डोकं वळवतात. खेड्यापाड्यांमधीलशेत - शिवारं, जुनी झाडं, पडक्या इमारती, नदीकाठची बाभळबनं, शहरांमधील बागा, उद्यानं आणि डोंगर-टेकड्यांवरील विरळ झाडी या पिंगळ्यांच्या राहण्याच्या जागा, पिंगळे जोडीने राहतात किंवा ७-८ जणांचा कुटुंबथवा काही वेळेस एकत्र राहताना दिसतो. टोळ, भ...

चश्मेवाला Oriental White-eye (Zosterops palpebrosus)

Image
दुसरं मराठी नाव : चाळिशीवाला इंग्रजी नाव : Oriental White - eye (ओरिएंटल व्हाइट - आय)  शास्त्रीय नाव : Zosterops palpebrosus (झूस्टेरॉप्स पॅल्पेब्रोसस)  लांबी : १० सें.मी.  आकार : चिमणीपेक्षा लहान            काहीसं विचित्र नाव असलेला हा छोटासा पक्षी बागा, उद्यानं, फळबागा, आमराया, उपवनं, पानझडीची जंगलं आणि खारफुटींमध्ये आढळतो. चार झाडांची निगा राखून घराशेजारी फुलवलेल्या छोट्या बागेतही तो हजेरी लावतो. राखी वल्गुली, शिंजीर, जांभळा शिंजीर, सुभग, तुरेवाला वल्गुली, राखी वटवट्या, शिंपी, ब्राउन चिफचॅफ या चिंट्यापिंट्यांच्या मंडळाचा सभासद असलेला चश्मेवाला जरा लांब असेल तर दुर्बिणीशिवाय ओळखणं अवघड आहे. हिरव्या - पिवळ्या रंगाच्या या पक्ष्याच्या डोळ्यांभोवती चश्म्यासारखी दिसणारी पांढरी कडी असतात. त्यामुळे एकदा का त्याचा ' चश्मा ' दिसला की ओळख पक्की झाली असं समजावं. जवळजवळ सगळं आयुष्य झाडावर काढणारा चश्मेवाला कधीही एकटा दिसत नाही.            हा मिश्राहारी पक्षी लहानसहान किडे, फुलांतला मधुरस आणि फळांवर गुजराण करतो. य...

कोतवाल Black Drongo ( Dicrurus macrocercus )

Image
इतर मराठी नावं : गोचिडखाऊ, गोचिडघुम्मा, काळवाण्या, गोचा, कावळी, काळा गोविंद, कोळसा, काळेट इंग्रजी नाव : Black Drongo ( ब्लॅक ड्रॉगो ) शास्त्रीय नाव :  Dicrurus macrocercus  ( डायरस मॅक्रोसरकस )  लांबी : २८ सें.मी.  आकार : बुलबुलापेक्षा मोठा             चमकदार काळा रंग आणि लांबलचक दुभंगलेली शेपटी असणारा कोतवाल हालचाली करणारा आणि ससाणे, वळे, घारी तसंच गरुडांसारख्या मोठ्या भक्षक पक्ष्यांचा वेगाने पाठलाग करून त्यांना हुसकावणारा हा कोतवाल पाहिल्यावर म्हणावसं वाटतं की ' छाती असावी तर कोतवालाची ! ' शेताच्या कुंपणावर, झाडाच्या उंच शेंड्यावर, विजेच्या किंवा टेलिफोनच्या तारेवर बसून हा किड्यांवर, नाकतोड्यांवर नजर ठेवून असतो. नाकतोडे, उडणाऱ्या वाळव्या, मुंगे, टोळ आणि मधमाश्यांबरोबरच पळसाच्या फुलातील मधुरसही तो आवडीने चाखतो. शेतीला हानिकारक असलेले कीटक खात असल्यामुळे तो शेतकऱ्यांचा मित्र आहे. एप्रिल ते ऑगस्ट या काळात हे पक्षी घरटी करतात. म्हशीच्या पाठीवर बसून मजेत फिरणारा कोतवाल खेड्यापाड्यात ' गोचिडखाऊ ' म्हणून परिचित आहे. शेतामध्ये राव सुरू असत...

खंडया White - throated Kingfisher (Halcyon smyrnensis)

Image
इतर मराठी नाव : बंड्या धीवर, डुबकन्या, ढीव, लालचाचू.  इंग्रजी नाव : White-throated Kingfisher (व्हाईट -थ्रोटेड किंगफिशर)   शास्त्रीय नाव : Halcyon smyrnensis (हॅल्सिऑन स्मिरनेन्सिस)  लांबी : २८ सें.मी.  आकार : साळुंखीपेक्षा  मोठा    नदीच्या काठावर असलेल्या शहरातील वसाहतींमध्ये सूर्योदयाच्या वेळी एक ललकारीसारखा स्पष्ट आवाज ऐकू येतो. एकदा ऐकला की कधीही विसरला जाणार नाही असा हा खंड्याचा आवाज दुसऱ्या कोणत्याही पक्ष्याच्या आवाजासारखा नसतो. हा परिचित आवाज म्हणजे खंड्या पक्ष्याने एक प्रकारे स्वतःची केलेली जाहिरात असते. मादीपर्यंत तो आवाज पोहोचवून तिला आकर्षित करणं आणि त्याचा इलाखा कोणता आहे, हे परिसरातल्या दुसऱ्या नराला सूचित करणं असे या आवाजाचे दोन अर्थ असतात. शहरातली वाहतूक आणि वर्दळीचे कर्णकटु आवाज सुरू व्हायच्या आधी खंड्या उंच इमारतीच्या सर्वांत टोकाशी असलेल्या टीव्हीच्या अँटेनावर बसून ' किलिलिलि ! ' असा लांबलचक आवाज काढतो. आवाज काढण्यासाठी त्याने गाठलेली वेळ आणि जिथे बसून आवाज काढला जातो त्या उच्चासनामुळे खंड्याला दुहेरी फायदा होतो....

सर्पदंश

Image
सर्पदंश  पावसाचे दिवस आहेत . या काळात सर्पदंशाच्या घटना वारंवार घडतात . सर्पदंश कसा ओळखावा आणि त्यावर तातडीचे उपाय काय आहेत याबाबत या लेखात लिहिण्याचा प्रयत्न केला आहे .  • विषारी साप :  भारतात ५५० प्रकारचे साप आढळतात . यातील फक्त   Russell's viper ,Common krait , saw-scaled viper, Indian cobra  हे अत्यंत विषारी आहेत आणि अन्य १० जातीचे साप विषारी गणले जातात . इतर प्रकारचा साप चावल्यास माणसाचा मृत्यू होईलच असे नाही . परंतु साप चावला या भितीनेच हृदयविकाराचा झटका येतो आणि मृत्यू होतो. 1. भारतीय नाग    Indian cobra  (Naja naja)   2. मण्यार  common krait  ( Bungarus caeruleus ) 3.घोणस  Russell's viper  ( Daboia russelii) 4.फुरसे  Saw - scaled viper  (Echis carinatus) • सर्पदंशाच्या खुणाः विषारी सापामध्ये दोन मोठे व आतील बाजूस वळलेले विषदंत असतात आणि जबड्यातील इतर दात लहान असतात . ज्या वेळी विषारी साप चावा घेतो , तेव्हा त्याच्या दातांच्या खुणा . . अशा ठळकपणे उमटतात , विषदंतांचे दोन मोठे खोल व...

कोतवाल - Black drongo (Dicrurus macrocerus)

Image
इतर मराठी नावं : गोचिडखाऊ , गोचिडघुम्मा , काळबाण्या , गोचा , कावळी , काळा गोविंद ,कोळसा , काळेट , बाणवा , कारगोच्या  इंग्रजी नाव : Black Drongo ( ब्लॅक ड्रोंगो )  शास्त्रीय नाव : Dicrurus macrocercus ( डायक्रुरस मॅक्रोसरकस )  लांबी : २८ सें.मी.  आकार : बुलबुलापेक्षा मोठा  Black drongo © wikipedia चमकदार काळा रंग आणि लांबलचक दुभंगलेली शेपटी असणारा कोतवाल नावाप्रमाणेच धीट आहे . चपळ हालचाली करणारा आणि ससाणे , कावळे , घारी तसंच गरुडांसारख्या मोठ्या भक्षक पक्ष्यांचा वेगाने पाठलाग करून त्यांना हुसकावणारा हा कोतवाल पाहिल्यावर म्हणावंसं वाटतं की ' छाती असावी तरकोतवालाची ! ' शेताच्या कुंपणावर , झाडाच्या उंच शेंड्यावर , विजेच्या किंवा टेलिफोनच्या तारेवर बसून हा किड्यांवर , नाकतोड्यांवर नजर ठेवून असतो . नाकतोडे , उडणाऱ्या वाळव्या , भुंगे , टोळ आणि मधमाश्यांबरोबरच पळसाच्या फुलातील मधुरसही तो आवडीने चाखतो . शेतीला हानिकारक असलेले कीटक खात असल्यामुळे तो शेतकऱ्यांचा मित्र आहे . एप्रिल ते ऑगस्ट या काळात हे पक्षी घरटी करतात . म्हशीच्या पाठीवर बसून मजेत फिरणारा कोतवाल खेड्यापाड्य...

कोकीळ - asian koel (eudynamys scolopacea)

Image
इतर मराठी नावं : कोकीळ ( नर ) , कोकिळा ( मादी ) , कोयर , कोयार  इंग्रजी नाव : Asian Koel ( एशियन कोएल )  शास्त्रीय नाव : Eudynamys scolopacea ( युडायनिमस स्कोलोपेसिया )  लांबी : ४३ सें.मी.  आकार : डोमकावळ्यापेक्षा मोठा  वसंत ऋतूच्या आगमनाची चाहूल कोकीळ पक्षी आपल्या कुहू कुहू ' आवाजाने करून देतो . कुहू कुहू आवाज करणारा नर असतो . हे पक्षी झाडांवर वावरतात . कोकीळ पक्षी कधीच घरटं बांधत नाही . त्याची मादी म्हणजे कोकिळा . ती दुसऱ्या पक्ष्यांच्या , विशेषतः कावळ्याच्या घरट्यात अंडी घालते . कोकीळ हा मुख्यत्वेकरून फळं खाणारा पक्षी असून तो फुलपाखरांच्या आणि पतंगांच्या अळ्या ( घुले ) आणि कीटकही खातो . फळझाडांच्या शोधात हा पक्षी स्थानिक स्वरूपाचं स्थलांतर करतो . गुंजेसारखे लालबुंद डोळे असलेला नर काळा कुळकुळीत असतो तर तपकिरी रंगाच्या मादीच्या अंगावर पांढऱ्या रंगाचे ठिपके आणि चट्टेपट्टे यांचं मिश्रण असतं . त्यामुळे आणि उडण्याच्या झपाट्यामुळे तिची ससाण्याशी गल्लत होऊ शकते .  Asian koel male © wikipedia आंब्याच्या राया , शेती - बागायती आणि शहरातील उद्यानांमध्येदेखील कोकीळ ...

कावळा - डोमकावळा -: Indian Jungle Crow (corvus macrorhynchos)

Image
इतर मराठी नावं : डोंबकावळा , जंगल कावळा सध्याचं इंग्रजी नाव : Indian Jungle Crow ( इंडियन जंगल क्रो ) आधीचं इंग्रजी नाव : Large - billed Crow शास्त्रीय नाव : Corvus macrorhynchos ( कॉरव्हस मॅक्रोहिंकस ) लांबी : ४१ सें . मी . आकार : घारीपेक्षा लहान (Corvus macrorhynchos) photo © wikipedia भलीमोठी भरभक्कम चोच असलेला आणि उग्र दिसणारा डोमकावळा किंवा डोंबकावळा म्हणजे मला तर छोट्या शिकारी पक्ष्याचाच एक अवतार वाटतो . बाकदार चोच , भक्कम पंजे , धारदार नख्या आणि झपाटा मारणारे पंख या जमेच्या बाजू नसल्या तरी हा पक्षी त्याच्या अंगात असलेलं धाडस , उभयाहार आणि बेरकीपणा या गुणांवर टिकून आहे . ' डोंब ' या शब्दाचा अर्थ स्मशानात , मसणवटीत चाकरी करणारा माणूस . डोंबाप्रमाणेच कावळ्याची ही जात स्मशानात दिसते म्हणून डोमकावळा हे नाव . गावकावळ्यापेक्षा मोठ्या आकाराचा हा डोमकावळा जणू डांबराच्या पिंपात बुडवून काढला आहे असं वाटावं इतका काळाकिट्ट असतो . आजकाल शहरभागात राखाडी मानेचा  गावकावळा आणि हा काळा कुळकुळीत डोमकावळा एकत्र दिसतात . एरवी हा पक्षी  शहरांच्या बाहेर खेड्यापाड्यांमध्ये राह...

Popular posts from this blog

साळुंकी Common Myna (Acridotheres tristis)

जांभळा शिंजीर Purple Sunbird (Nectarinia asiatica)

FISH DIVERSITY IN NIRA RIVER