दुसरं मराठी नाव : कमका बोदल
इंग्रजी नाव : Common lora ( कॉमन आयोरा )
शास्त्रीय नाव : Aegithina tiphia ( एगीथिना टिफिया )
लांबी : १४ सें.मी.
आकार : चिमणीएवढा

हा एक छोटासा सुंदर पक्षी आहे. पाठीकडून काळ्या आणि पोटाकडून पिवळ्या रंगाच्या सुभगाच्या पंखावर दोन पांढरे पट्टे असतात. शेपटी काळी असते. मुख्यतः झाडावर राहणारा हा पक्षी अळ्या, कीटक आणि कोळी खातो. पानझडीच्या जंगलात, शहरातील भरपूर झाडं असलेल्या भागांमध्ये, आंबा, चिंच, कडुनिंबाच्या उपवनांमध्ये सुभगाची वेड लावणारी शीळ ऐकू येते. सरासरी पाऊसमान ३०० मिलिमीटर असलेल्या रखरखीत प्रदेशातही सुभग दिसतो. शेतांच्या बांधावर लावलेल्या आणि परिसरात उगवून आलेल्या बाभूळ, शेवगा, कडुनिंब ,हादगा, चिंच, बोर, आंबा अशा झाडांच्या हिरव्या पुंजक्यांमध्ये सुभगाला आपली जागा सापडते. विणीच्या हंगामात मादीला आकर्षित करण्यासाठी आणि परिसरातल्या इतर नरांना इशारा देण्यासाठी सुभगाचा नर एक प्रकारचा संकेत ( Courtship Display ). अशा वेळी तो पाठीवरच्या पांढऱ्या शुभ्र पिसांचा गोंडा फुलवून पंखांची जलद फडफड करत सरळ रेषेत ६ ते ७ फूट उंच उसळी किरण पुरंदरे विणीचा हंगाम सोडून इतर काळात मारतो आणि एखाद्या छत्रीधारी सुभगाचा नर असा दिसतो. सैनिकासारखा तरंगत तरंगत जवळच्या झाडाच्या शेंड्यावर अलगद उतरतो. झाडावर उतरल्यावरसुद्धा त्याची शेपूट उभारलेली असते आणि पंख शेपटीच्या दोन्ही बाजूला पाडलेले असतात. अत्यंत बघण्यासारखा हा संकेत नर पुन्हा पुन्हा करतो. साधारण मे ते सप्टेंबर या काळात सुभग पक्षी घरटं करतो. या पक्ष्याचं घरटं वाटीसारखं असून ते फांदीच्या दुबेळक्यात तयार केलं जातं. डहाळ्यांमध्ये, पानांमध्ये लपवलेलं घरटं. चांगली नजर असलेल्या पक्षिनिरीक्षकालाच सापडू शकतं. घरट्याचं साहित्य एकत्र बांधून ठेवण्यासाठी पक्षी कोळिष्टकांचा उपयोग करतो त्यामुळे त्याचं घरटं बाहेरून पांढऱ्या रंगाचं दिसतं. कोळ्याच्या धाग्यांचा भरपूर वापर केलेला असल्यामुळे घरट्यात पावसाचं पाणी शिरण्याचं प्रमाण कमी होतं. पावसापासून अंड्यांचं आणि पिल्लांचं रक्षण होतं. सुभगाची शीळ ऐकून जर साधारण तशीच शीळ आपण घातली, तर तो आपल्यालाही प्रतिसाद देतो. त्याला वाटतं की आपल्याला दुसरा नर सुभग आव्हान देतोय किंवा दुसरा नर आपल्या राज्यात आलाय, मग आपणही त्याची शीळ घालत राहिलो तर तो आपल्याला शोधत जवळ येतो. अस्वस्थ होतो, पिसं फिस्कारतो. काळ्याभोर डोळ्यांनी इकडे तिकडे पाह लागतो. त - हेत - हेच्या नवीन शिट्ट्या मारतो. सुभगाच्या या शिव्या ऐकायच्या असतील तर एक करायचं, भर उन्हाळ्यात, आंब्याच्या मोसमात एखाद्या आमराईत जायचं आणि कान उघडे ठेवायचे.
Comments
Post a Comment