दयाळ

Image
इतर मराठी नावं : डोमिंगा, सुईणबुड्डी, खोडाकुशी, वट्टी, कोडामल्ली  सध्याचं इंग्रजी नाव : Oriental Magpie Robin (ओरिएंटल मॅगपाय रॉबिन)  आधीची इंग्रजी नावं : Dayal (दयाल), Magpie Robin (मॅगपाय रॉबिन)  शास्त्रीय नाव : Copsychus saularis (कॉपसिकस सॉलॅरिस)  लांबी : २३ सें.मी.  आकार : बुलबुलापेक्षा मोठा            सरसरत उंच गेलेल्या गगनजाईच्या हिरव्या मनोऱ्याच्या टोकाशी बसून 'उस्ताद दयाल खाँ' गाणं गात असतात. एका मागून एक गोड सुरांच्या माळाच त्यांच्या कंठातून बाहेर पडत असतात. या गवयाची गाण्याची बैठक पक्की ठरलेली असते. त्यामुळे अपॉइंटमेंट घेतल्यासारखं त्याला पुन्हा पुन्हा पाहता येतं. पक्ष्यांमधला सुप्रसिद्ध गायक श्याम (White - rumped Shama) , a (Indian Robin) tror ferfert (Black Redstart) यांच्या फॅमिलीतल्या दयाळाची ओळख पटवणं अगदी सोपं आहे. नर काळाकुळकुळीत आणि पोटाशी पांढरा शुभ्र, तर मादी राखाडी रंगाची असते. परसबागा, उद्यानं, फळबागा, आमराया, गावखेड्यांच्या आसपासचा झाडझाडोरा आणि पानगळीचं जंगल हा त्याचा अधिवास आहे. दयाळ हा एक सहजपणे दिसणारा स्थायिक पक्षी आहे. मनुष्यवस्तीशी जुळवून घेतलेला

जांभळा शिंजीर Purple Sunbird (Nectarinia asiatica)

इतर मराठी नावं : जांभळा सूर्यपक्षी , चुमका , मधुकर 
इंग्रजी नाव : Purple Sunbird (पर्पल सनबर्ड) 
शास्त्रीय नाव : Nectarinia asiatica ( नेक्टरिनिया एशियाटिका ) 
लांबी : १० सें.मी. 
आकार : चिमणीपेक्षा लहान 

जांभळा शिंजीर नर 


जांभळा शिंजीर मादी 

          शहरं - नगरांमध्ये राहणारा, नाजूक चिवचिवाट करणारा जांभळा शिंजीर, दूर मोकळ्या रानातही दिसतो. कमालीचा चंचल आणि चपळ असा हा चिमुकला पक्षी पहिल्यांदा साध्या डोळ्यांनी शोधून नंतर दुर्बिणीत पकडायचा म्हणजे घामटा निघतो. तपशीलवार निरीक्षण करणं ही फार पुढची गोष्ट झाली. वसंतात रानपांगारा ( Wild Coral Tree ) फुलला की हा जांभळा ' ठिपका ' मधुरसाची मेजवानी झोडायला झाडावर येतो. पातळ , बाकदार आणि टोकदार चोच आणि जिभेची नळी वापरून मकरंद चोखून घेतो. मधूनच लहर फिरली की मान उंचावून हवेवर एक लांबलचक चिवचिवाटी तान सोडून देतो. ' चि - चि - चि - चि - चि - चिविक् -चिविक् - चिविक् -चिविक् - चिरी - चिक् -चिक् चिक् - चिक् ! आपण सूर्याकडे पाठ करून पाहत असलो, तर पक्ष्याच्या अंगाव्द पडलेल्या उन्हात एक खास तकाकी असलेला निळा - जांभळा रंग झळकतो आणि नकळत आपल्या ओठांमधून उद्गार बाहेर पडतो - ' आईशप्पथ ! ' पांगाऱ्याच्या रसवंतीगृहाला भेट देणाऱ्या पक्ष्यांमध्ये शिंजीर हा काही एकटाच पक्षी नसतो. त्याला इतर स्पर्धकही असतात. मग तू - तू , मी - मी होतं . इतर छोट्या पक्ष्यांना, विशेषतः शिंजीरांना हाकलून देण्याच्या इराद्याने तात्पुरती, लुटुपुटुची भांडणं होतात. ऐन वसंतात अशा अनेक पुष्पवृक्षांवर पुष्पपक्ष्यांचे मेळे भरतात आणि उन्हाळा थोडा सुसहा करतात. पांगारा, रानपांगारा, काटेसावर, टणटणी, पळस, लाल कुंचला, कपोक किंवा पांढरी सावर, घायटी, नेपती, शेवगा  निलगिरी, शंकासूर ,पावडर पफ, हॅमेलिया ( एक अमेरिकन झुडूप ) या झाडाझुडपांना मकरंदासाठी भेट देणाऱ्या पक्ष्यांमध्ये जांभळा शिंजीर नेहमी पुढे असतो . तो फुलाचं परागीभवन करतो. स्वपरागीभवनापेक्षा परपरागीभवन अधिक महत्त्वाचं असतं. कारण परपरागीभवनामध्ये जनुकांची देवाणघेवाण होते. पक्षी जेव्हाजांभळा शिंजीर नर माधवी कवी परागीभवन करतात तेव्हा ते परपरागीभवन या वर्गात मोडतं . कारण पक्षी एका फुलाकडून दुसऱ्या फुलाकडे जातात . पक्ष्यांच्या या मध्यस्थीमुळे अर्थातच उत्कृष्ट दर्जाच्या बियाणांची आणि पिढ्यानपिढ्या उत्तम फलधारणा होणाऱ्या वृक्षांची सतत निर्मिती होत राहते. गजबजलेल्या शहरांमध्येदेखील परसबागा, उद्यान, नद्यांच्या काठांवरील उरल्यासुरल्या वनस्पती, टेकड्या, रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना असणारी झाडेझुडपं, जमिनींवरील झाडझाडोरा असे छोटे छोटे आसरे असतात. नेहमीच्या शिंजीराच्या साथीने जांभळा शिंजीरही अशा छोट्या छोट्या अधिवासांमध्ये दिसतो. चिवचिवाटाच्या, चिरचिराटाच्या आणि किचकिचाटाच्या अनेक वेगवान आवर्तनांनी नराचं गाणं बनतं. गाणं सादर करताना तो नीट दिसेल अशा ठिकाणी - झाडाच्या शेंड्यावर बसतो. एकसारखा मान हलवून वेगवेगळ्या दिशांना बघत राहतो  चिमुकल्या पंखांची उघडझाप करतो. पंखांच्या या हालचालींमुळे ' खांद्याच्या ' जागी उठावदार पिवळ्या आणि शेंदरी पिसांचे गोंडे दिसायला लागतात आणि नराचा भाव वधारतो. कोणताही पक्षी विशिष्ट झाडावरच घरटं बांधतो असं नसून झाडाचं किंवा वेलीचं स्थानमहत्त्वाचं असतं. माणसाच्या सान्निध्यात पक्ष्यांना सुरक्षित वाटतं. लहान आकारांचे नि आणि मकरंद पुरवणाऱ्या झाडाझुडपांचा शेजार पसंत करणारे शिंजीर इतर कितीतरी पय उपलब्ध असूनही पुष्कळदा घरांच्या जवळपास घरटं करतात . खेड्यापाड्यात सावलीसा अंगणात उभारलेल्या मांडवाखाली घरटं केलं जातं. घरट्यांसाठी निवडलेल्या काही जान तर फार धाडसी असतात. उदाहरणार्थ, विजेच्या वायरी ( या बहुधा कोणत्याही वेलीपेक्ष किंवा फांदीपेक्षा जास्त मजबूत असतात म्हणून निवडल्या जातात ), व्हरांड्यातली वेल काही घरटी हाताला लागतील इतकी खाली असतात . खाद्यासाठी धसमुसळेपणा करणार पिल्लं कधी कधी पूर्ण वाढ व्हायच्या आतच घरट्यांमधून खाली पडतात. ती अलग उचलून घरट्यात ठेवली तरी पालक त्यांना स्वीकारतात आणि लगेच भरवायला सुरुवात करतात. पण घरट्याबाहेर कुठेतरी पडलेल्या पिल्लाकडे, ते सतत ' चीईक् - चीईक् - चीईक् ! " असा अन्नाची मागणी करणारा आवाज काढत असलं तरी , पूर्णपणे दुर्लक्ष केलं जातं . याचं कारण पालक पक्ष्यांना त्या आधीचे कितीतरी दिवस पिल्लू घरट्यात बघायची सवय झालेली असते . त्यामुळे घरट्यातलं ते आपलं आणि बाहेरचं ते परकं असा न्याय ते करतात, काही वेळा घरटीसुद्धा खाली पडतात. अशा वेळी अजिबात वेळ न घालवता घरटं मुळात जिथे होतं, तिथे सुतळीने किंवा दोऱ्याने बांधून टाकलं तरी चालतं. पक्षी ताबडतोब त्यांचे व्यवहार सुरू करतात. सर्वात वाईट प्रकार म्हणजे काही वेळा लोकांना - विशेषतः बागकाम करणाऱ्या माळ्याला किंवा साफसफाई करणाऱ्या नोकरवर्गाला शिंजीराचं घरटं म्हणजे चक्क कचरा वाटतो. हे लोक शांतपणे घरटं काढून टाकून देतात ! म्हणून प्रत्येकाने सावध राहून ' सरसकट सफाई कार्यक्रम ' राबवताना काळजी घेतली पाहिजे. 
       
शिंजीर पक्ष्याचे घरटे 

             जांभळ्या शिंजीराच्या बाबतीत घरटं करण्यासाठी निवडलेल्या जागांमध्ये बरीच विविधता आढळते. काटेवनात दिसणाऱ्या एका हिवराच्या झाडाला कोळ्यांनी ( Erisidae फॅमिलीतील या कोळ्यांना ' समाजप्रिय ' कोळी - Social Spiders असं म्हणतात . ) अक्षरशः जागा मिळेल तिथे जाळी बांधून पार गुरफटून टाकलं होतं. लांबून पाहिलं तर जणू काही त्या झाडाच्या मुसक्या बांधल्यासारख्या दिसत होत्या. एका जांभळ्या शिंजीराने कोळ्यांच्या गोधडीसारख्या दिसणाऱ्याजाळ्यात कोरून आपलं घरटं तयार केलं होतं. इतका भक्कम धार आणि काट्याकुट्यांचं लायतं चिलखत क्वचितच सऱ्या शिजीराच्या वाट्याला त असेल ! घरट्यासाठी नागा निवडणं, घरटं बांधणं आणि अंडी उबवणं ही सगळी काम एकटी मादी करते या महत्त्वाच्या आघाड्यांवर असताना तिचे मळकट रंग लपूनछपून राहायला मदत करतात. अंडी फोडून पिल्लं बाहेर आली की, नर आणि मादी मिळून पिल्लांना भरवतात. मकरंद पुरवणाऱ्या झाडाझुडपांना फुलांचा बहार येणं आणि शिंजीराचा विणीचा हंगाम ( मार्च ते जून ) बरोबर जुळतो. घरट्यातली पिल्लं उडून गेल्यावरसुद्धा शिंजीराच्या घरट्याला हात लावू नये. हा पक्षी दुसऱ्या खेपेलाही तेच घरटं वापरल्याची नोंद झालेली आहे. शिंजीराच्या नैसर्गिक अधिवासात आपण वर्षभर गळणाऱ्या नळांची योजना आधीच करून ठेवलेली असते. उन्हाळा लागला की या नळांना एकदम महत्त्व प्राप्त होतं. या नळांवर दुपारी एकाच वेळी अनेक जांभळे शिंजीर गोळा होतात. नळातून खाली पडणारे थेंब हॉवरिंग ( पंखांची वेगवान फडफड करत एकाच जागी अधांतरी ' लटकून ' राहणं ) करत अलगद टिपणाऱ्या पक्ष्याचं वेळेचं नियोजन अफलातून असतं. नळाच्या आट्यांमधून गळणारं पाणीही त्याला पुरतं. त्याची खास चोच आणि जीभ पाणी ओढून घेते. संपूर्ण उन्हाळाभर शिजीरांचा हा सार्वजनिक नळकोंडाळ्यावरचा जलपानसोहळा बघता येतो.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

साळुंकी Common Myna (Acridotheres tristis)

पिंगळा Spotted Owlet (Athene brama)