दयाळ

Image
इतर मराठी नावं : डोमिंगा, सुईणबुड्डी, खोडाकुशी, वट्टी, कोडामल्ली  सध्याचं इंग्रजी नाव : Oriental Magpie Robin (ओरिएंटल मॅगपाय रॉबिन)  आधीची इंग्रजी नावं : Dayal (दयाल), Magpie Robin (मॅगपाय रॉबिन)  शास्त्रीय नाव : Copsychus saularis (कॉपसिकस सॉलॅरिस)  लांबी : २३ सें.मी.  आकार : बुलबुलापेक्षा मोठा            सरसरत उंच गेलेल्या गगनजाईच्या हिरव्या मनोऱ्याच्या टोकाशी बसून 'उस्ताद दयाल खाँ' गाणं गात असतात. एका मागून एक गोड सुरांच्या माळाच त्यांच्या कंठातून बाहेर पडत असतात. या गवयाची गाण्याची बैठक पक्की ठरलेली असते. त्यामुळे अपॉइंटमेंट घेतल्यासारखं त्याला पुन्हा पुन्हा पाहता येतं. पक्ष्यांमधला सुप्रसिद्ध गायक श्याम (White - rumped Shama) , a (Indian Robin) tror ferfert (Black Redstart) यांच्या फॅमिलीतल्या दयाळाची ओळख पटवणं अगदी सोपं आहे. नर काळाकुळकुळीत आणि पोटाशी पांढरा शुभ्र, तर मादी राखाडी रंगाची असते. परसबागा, उद्यानं, फळबागा, आमराया, गावखेड्यांच्या आसपासचा झाडझाडोरा आणि पानगळीचं जंगल हा त्याचा अधिवास आहे. दयाळ हा एक सहजपणे दिसणारा स्थायिक पक्षी आहे. मनुष्यवस्तीशी जुळवून घेतलेला

कोतवाल Black Drongo ( Dicrurus macrocercus )

इतर मराठी नावं : गोचिडखाऊ, गोचिडघुम्मा, काळवाण्या, गोचा, कावळी, काळा गोविंद, कोळसा, काळेट
इंग्रजी नाव : Black Drongo ( ब्लॅक ड्रॉगो ) शास्त्रीय नाव : Dicrurus macrocercus ( डायरस मॅक्रोसरकस ) 
लांबी : २८ सें.मी. 
आकार : बुलबुलापेक्षा मोठा


 
          चमकदार काळा रंग आणि लांबलचक दुभंगलेली शेपटी असणारा कोतवाल हालचाली करणारा आणि ससाणे, वळे, घारी तसंच गरुडांसारख्या मोठ्या भक्षक पक्ष्यांचा वेगाने पाठलाग करून त्यांना हुसकावणारा हा कोतवाल पाहिल्यावर म्हणावसं वाटतं की ' छाती असावी तर कोतवालाची ! ' शेताच्या कुंपणावर, झाडाच्या उंच शेंड्यावर, विजेच्या किंवा टेलिफोनच्या तारेवर बसून हा किड्यांवर, नाकतोड्यांवर नजर ठेवून असतो. नाकतोडे, उडणाऱ्या वाळव्या, मुंगे, टोळ आणि मधमाश्यांबरोबरच पळसाच्या फुलातील मधुरसही तो आवडीने चाखतो. शेतीला हानिकारक असलेले कीटक खात असल्यामुळे तो शेतकऱ्यांचा मित्र आहे. एप्रिल ते ऑगस्ट या काळात हे पक्षी घरटी करतात. म्हशीच्या पाठीवर बसून मजेत फिरणारा कोतवाल खेड्यापाड्यात ' गोचिडखाऊ ' म्हणून परिचित आहे. शेतामध्ये राव सुरू असताना आगीची घग लागून उडणारे किडे टिपण्यासाठी कोतवालांची गर्दीहोते 

             

भरपूर किडे असणारी जागा गजबजलेल्या शहरात जरी असली तरी कोतवाल तिथे येतो. तो टीव्हीच्या अँटनावर बसून हवेत झेपावत किडे पकडतो . कोतवालाची लांबलचक, दुभंगलेली शेपूट त्याला हवेतून सुरकांड्या मारायला, झेपा टाकायला उपयोगी पडते. रायगड जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यात कशेळे नावाचं गाव आहे . या गावात मला कोतवालाचं अत्यंत सुरेख नाव कळलं - बाणवा. तर हा बाणवा ज्या झाडावर घरटं करतो, त्या झाडाच्या आसपासच्या झाडांवर सातभाई, हळद्या, सुभग, दयाळ, ढोरकवडी, साळुकी, जंगल मैना अशा पक्ष्यांचीही घरटी सापडतात. घार, गरुड यांसारख्या मोठ्या शिकारी पक्ष्यांना हाकलून लावण्याच्या कोतवालाच्या कर्तबगारीचा फायदा या ' भिरू ' पक्ष्यांनाही होतो. भिरू म्हणजे भित्रे, एखाद्या गावाचा कोतवाल जसा वाड्यावस्त्यांचं रक्षण करतो, तसा हा पक्ष्यांमधला कोतवाल इतर पक्ष्यांना आधार वाटतो. हिवाळ्याच्या शेवटी शेवटी कोणीतरी एखाद्या टेकडीवरच्या किंवा डोंगरावरच्या गवता - रानात काडी टाकतं. धूर वर उलू लागतो. मग कुठून गोळा होतात कुणास ठाऊक, पण हा हा म्हणता शंभरावर कोतवाल आगीच्या ठिकाणी सहज जमा होतात. अशी जागा शहराला लागून असेल, तर कोतवालांच्या जोडीला काही घारी येतात. गोल गोल फिरत आकाशात घिरट्या घालतात. मधूनच सफाईदार सूर मारत जमिनीकडे झेपावतात. बहुदा एकमेकांचे आवाज ऐकून, परस्परांचं अनुकरण करत कोतवालांचा थवा तयार होतो आणि आगीच्या ठिकाणी गोळा होतो. जाळरेषेला धरून पक्षी विखुरतात, छोट्या झुडपाचा किंवा झाडाचा निरीक्षण मनोन्यासारखा उपयोग करतात. मग एका झाडावर बसलेले दहा ते बारा कोतवाल असं दृश्य दिसतं. आधीच जळालेल्या आणि काळ्या पडलेल्या भागात काही सापडत नाही, आगीची धग लागून उडणारे किडेमकोडे, उड्या मारणारे टोळ, नाकतोडे सुटकेसाठी धडपडतात आणि कोतवालांच्या चोचीमध्ये सापडतात. काही पक्षी झाडावरची टेहळणी सोडून न जळालेल्या गवतात उभं राहून किड्यांची हालचाल बघत बसतात. काही सापडलं की तिथल्या तिथे टिपतात. डोंगरभर लागलेली सगळी आग पटकन विझत नाही. कुठेतरी एखादं आगीचं तांबडं - पिवळं बेट पेटत असतंच. किड्यांच्या शिकारी करणारे सगळे कोतवाल मग तिथे जमतात. अचानक टपकलेला एखादा नीलपंख किंवा काठावरून कोरडं राहून समुद्राकडे बघितल्यासारखं आकाशातून आगीकडे पाहणाऱ्या घारीपेक्षा कोतवालच या परिस्थितीचा जास्तीत जास्त फायदा उठवतात. डोळ्यांना दिसणारं आगीचं दृश्य आणि चरचर आवाज करत पेटणारं गवत याबरोबरच कोतवालांना धुराचा वास येत असावा अशी मला दाट शंका आहे. कोतवालाची वीण फेब्रुवारी ते ऑगस्ट या काळात होते. आंबा, बाभूळ, कडुनिंब अशा झाडांच्या जमिनीपासून ४ ते १२ मीटर उंचीवर असलेल्या फांदीच्या टोकाशी असलेल्या बेचक्यात वाटीसारखं घरटं बनवलं जातं. बारीक काड्या, तंतू, गवत चा वापर करून तयार केलेल्या घरट्याला बाहेरच्या बाजूने कोळ्याच्या रेशमाचा गिलावा केलेला असतो. त्यामुळे घरट्याला मजबुती येते. शिवाय पावसाची झड आली, तर घरट्यात जाणाऱ्या पाण्याला अटकावही होतो. घरट्याच्या वाटीची खोली आणि गोलाई तपासून बघण्यासाठी पक्षी अधूनमधून घरट्यात बसून बघतो. पाय झाडल्यासारखे करून गोल गोल फिरतो. त्याच्या छातीमुळे घरट्याला गोलाई येते. या घरट्यात मादी सुमारे ३ ते ५ अंडी घालते. अंडी उबवणं, पिल्लांना भरवणं आणि कावळा - शिक्रा - घारीसारख्या पक्ष्यांना घरट्याच्या परिघातून हाकलून लावणं ही कामं नर आणि मादी मिळून करतात. घरटं सोडून इकडेतिकडे उडायला लागलेल्या पिल्लांच्या शेपट्यांमधल्या खाचा ( Fork ) खोल नसतात. अशा पिल्लांच्या पोटांवर, शेपट्यांच्या वर आणि खाली फिक्कट पांढऱ्या रंगाची पिसं असतात.

Comments

Popular posts from this blog

जांभळा शिंजीर Purple Sunbird (Nectarinia asiatica)

साळुंकी Common Myna (Acridotheres tristis)

पिंगळा Spotted Owlet (Athene brama)