दयाळ

Image
इतर मराठी नावं : डोमिंगा, सुईणबुड्डी, खोडाकुशी, वट्टी, कोडामल्ली  सध्याचं इंग्रजी नाव : Oriental Magpie Robin (ओरिएंटल मॅगपाय रॉबिन)  आधीची इंग्रजी नावं : Dayal (दयाल), Magpie Robin (मॅगपाय रॉबिन)  शास्त्रीय नाव : Copsychus saularis (कॉपसिकस सॉलॅरिस)  लांबी : २३ सें.मी.  आकार : बुलबुलापेक्षा मोठा            सरसरत उंच गेलेल्या गगनजाईच्या हिरव्या मनोऱ्याच्या टोकाशी बसून 'उस्ताद दयाल खाँ' गाणं गात असतात. एका मागून एक गोड सुरांच्या माळाच त्यांच्या कंठातून बाहेर पडत असतात. या गवयाची गाण्याची बैठक पक्की ठरलेली असते. त्यामुळे अपॉइंटमेंट घेतल्यासारखं त्याला पुन्हा पुन्हा पाहता येतं. पक्ष्यांमधला सुप्रसिद्ध गायक श्याम (White - rumped Shama) , a (Indian Robin) tror ferfert (Black Redstart) यांच्या फॅमिलीतल्या दयाळाची ओळख पटवणं अगदी सोपं आहे. नर काळाकुळकुळीत आणि पोटाशी पांढरा शुभ्र, तर मादी राखाडी रंगाची असते. परसबागा, उद्यानं, फळबागा, आमराया, गावखेड्यांच्या आसपासचा झाडझाडोरा आणि पानगळीचं जंगल हा त्याचा अधिवास आहे. दयाळ हा एक सहजपणे दिसणारा स्...

कोकीळ - asian koel (eudynamys scolopacea)


इतर मराठी नावं : कोकीळ ( नर ) , कोकिळा ( मादी ) , कोयर , कोयार 
इंग्रजी नाव : Asian Koel ( एशियन कोएल ) 
शास्त्रीय नाव : Eudynamys scolopacea ( युडायनिमस स्कोलोपेसिया ) 
लांबी : ४३ सें.मी. 
आकार : डोमकावळ्यापेक्षा मोठा 

वसंत ऋतूच्या आगमनाची चाहूल कोकीळ पक्षी आपल्या कुहू कुहू ' आवाजाने करून देतो . कुहू कुहू आवाज करणारा नर असतो . हे पक्षी झाडांवर वावरतात . कोकीळ पक्षी कधीच घरटं बांधत नाही . त्याची मादी म्हणजे कोकिळा . ती दुसऱ्या पक्ष्यांच्या , विशेषतः कावळ्याच्या घरट्यात अंडी घालते . कोकीळ हा मुख्यत्वेकरून फळं खाणारा पक्षी असून तो फुलपाखरांच्या आणि पतंगांच्या अळ्या ( घुले ) आणि कीटकही खातो . फळझाडांच्या शोधात हा पक्षी स्थानिक स्वरूपाचं स्थलांतर करतो . गुंजेसारखे लालबुंद डोळे असलेला नर काळा कुळकुळीत असतो तर तपकिरी रंगाच्या मादीच्या अंगावर पांढऱ्या रंगाचे ठिपके आणि चट्टेपट्टे यांचं मिश्रण असतं . त्यामुळे आणि उडण्याच्या झपाट्यामुळे तिची ससाण्याशी गल्लत होऊ शकते . 

Asian koel male. Image - ©wikipedia
Asian koel male © wikipedia

आंब्याच्या राया , शेती - बागायती आणि शहरातील उद्यानांमध्येदेखील कोकीळ दिसतो . कोकिळा आणि कावळा या दोन पक्ष्यांमध्ये कायम भांडणं , कुरबुरी सुरू असतात . कोकिळा कावळ्याच्या घरट्यात अंडी घालून पसार होते . अंडी उबवणं आणि आपल्या पिल्लांबरोबर कोकिळेच्या पिल्लांनाही भरवणं हे काम कावळा करतो . विणीचा हंगाम ( एप्रिल ते ऑगस्ट ) संपला , की कोकीळ पक्ष्याचं गाणं बंद होतं . जणू काही अळी मिळी गुप चिळीच ! तुती ( Mulberry ) , विलायती चिंच , सिंगापूर चेरी या झाडांना फळं धरली आणि ती पिकली ही बातमी कोकिळेला सर्वांत आधी समजत असावी . नर आणि मादी लगेच या झाडांवर हजेरी लावतात . अशा वेळी आपण खूप हालचाल केली , तर ते सतत टपून बसलेल्या कावळ्यांना कळेल आणि ते आपल्याला हाकलून देतील म्हणून कोकिळा जणू काही एकाच गोठल्यासारखी झाडावर ठिकाणी बसून राहते . 

Asian koel female © wikipedia


Comments

Popular posts from this blog

साळुंकी Common Myna (Acridotheres tristis)

जांभळा शिंजीर Purple Sunbird (Nectarinia asiatica)

FISH DIVERSITY IN NIRA RIVER