इतर मराठी नावं : गोचिडखाऊ , गोचिडघुम्मा , काळबाण्या , गोचा , कावळी , काळा गोविंद ,कोळसा , काळेट , बाणवा , कारगोच्या
इंग्रजी नाव : Black Drongo ( ब्लॅक ड्रोंगो )
शास्त्रीय नाव : Dicrurus macrocercus ( डायक्रुरस मॅक्रोसरकस )
लांबी : २८ सें.मी.
आकार : बुलबुलापेक्षा मोठा
 |
Black drongo © wikipedia |
चमकदार काळा रंग आणि लांबलचक दुभंगलेली शेपटी असणारा कोतवाल नावाप्रमाणेच धीट आहे . चपळ हालचाली करणारा आणि ससाणे , कावळे , घारी तसंच गरुडांसारख्या मोठ्या भक्षक पक्ष्यांचा वेगाने पाठलाग करून त्यांना हुसकावणारा हा कोतवाल पाहिल्यावर म्हणावंसं वाटतं की ' छाती असावी तरकोतवालाची ! ' शेताच्या कुंपणावर , झाडाच्या उंच शेंड्यावर , विजेच्या किंवा टेलिफोनच्या तारेवर बसून हा किड्यांवर , नाकतोड्यांवर नजर ठेवून असतो . नाकतोडे , उडणाऱ्या वाळव्या , भुंगे , टोळ आणि मधमाश्यांबरोबरच पळसाच्या फुलातील मधुरसही तो आवडीने चाखतो . शेतीला हानिकारक असलेले कीटक खात असल्यामुळे तो शेतकऱ्यांचा मित्र आहे . एप्रिल ते ऑगस्ट या काळात हे पक्षी घरटी करतात . म्हशीच्या पाठीवर बसून मजेत फिरणारा कोतवाल खेड्यापाड्यात ' गोचिडखाऊ ' म्हणून परिचित आहे . शेतामध्ये राब सुरू असताना आगीची धग लागून उडणारे किडे टिपण्यासाठी कोतवालांची गर्दी होते . भरपूर किडे असणारी जागा गजबजलेल्या शहरात जरी असली तरी कोतवाल तिथे येतो . तो टीव्हीच्या अँटेनावर बसून हवेत झेपावत किडे पकडतो . कोतवालाची लांबलचक , दुभंगलेली शेपूट त्याला हवेतून सुरकांड्या मारायला , झेपा टाकायला उपयोगी पडते . गरुड यांसारख्या मोठ्या शिकारी पक्ष्यांना हाकलून कोतवालाच्या कर्तबगारीचा फायदा या ' भिरू ' पक्ष्यांनाही होतो . भिरू म्हणजे भित्रे . एखाद्या गावाचा कोतवाल जसा वाड्यावस्त्यांचं रक्षण करतो , तसा हा पक्ष्यांमधला कोतवाल इतर पक्ष्यांना आधार वाटतो . हिवाळ्याच्या शेवटी शेवटी कोणीतरी एखाद्या टेकडीवरच्या किंवा डोंगरावरच्या गवता - रानात काडी कुणास पण हा हा म्हणता शंभरावर टाकतं . धूर कोतवाल वर उठू आगीच्या लागतो . ठिकाणी मग कुठून सहज गोळा जमा होतात होतात . अशी ठाऊक जागा , शहराला लागून असेल , तर कोतवालांच्या जोडीला काही घारी येतात . गोल गोल फिरत आकाशात घिरट्या घालतात . मधूनच सफाईदार सूर मारत जमिनीकडे झेपावतात . बहुदा एकमेकांचे आगीच्या आवाज ऐकून , परस्परांचं अनुकरण करत कोतवालांचा थवा तयार होतो आणि ठिकाणी गोळा होतो . जाळरेषेला धरून पक्षी विखुरतात . छोट्या झुडपाचा किंवा झाडाचा निरीक्षण मनोऱ्यासारखा उपयोग करतात . मग एका झाडावर बसलेले दहा बारा कोतवाल असं दृश्य दिसतं . आधीच जळालेल्या आणि काळ्या पडलेल्या भागात काही
Comments
Post a Comment