दयाळ

Image
इतर मराठी नावं : डोमिंगा, सुईणबुड्डी, खोडाकुशी, वट्टी, कोडामल्ली  सध्याचं इंग्रजी नाव : Oriental Magpie Robin (ओरिएंटल मॅगपाय रॉबिन)  आधीची इंग्रजी नावं : Dayal (दयाल), Magpie Robin (मॅगपाय रॉबिन)  शास्त्रीय नाव : Copsychus saularis (कॉपसिकस सॉलॅरिस)  लांबी : २३ सें.मी.  आकार : बुलबुलापेक्षा मोठा            सरसरत उंच गेलेल्या गगनजाईच्या हिरव्या मनोऱ्याच्या टोकाशी बसून 'उस्ताद दयाल खाँ' गाणं गात असतात. एका मागून एक गोड सुरांच्या माळाच त्यांच्या कंठातून बाहेर पडत असतात. या गवयाची गाण्याची बैठक पक्की ठरलेली असते. त्यामुळे अपॉइंटमेंट घेतल्यासारखं त्याला पुन्हा पुन्हा पाहता येतं. पक्ष्यांमधला सुप्रसिद्ध गायक श्याम (White - rumped Shama) , a (Indian Robin) tror ferfert (Black Redstart) यांच्या फॅमिलीतल्या दयाळाची ओळख पटवणं अगदी सोपं आहे. नर काळाकुळकुळीत आणि पोटाशी पांढरा शुभ्र, तर मादी राखाडी रंगाची असते. परसबागा, उद्यानं, फळबागा, आमराया, गावखेड्यांच्या आसपासचा झाडझाडोरा आणि पानगळीचं जंगल हा त्याचा अधिवास आहे. दयाळ हा एक सहजपणे दिसणारा स्...

शिक्रा Shikra (Accipiter badius)

इतर मराठी नावं : शिक्रा ( मादी ), चीपक किंवा चिपका ( नर ), शिकारा 
इंग्रजी नाव : Shikra ( शिक्रा ) 
शास्त्रीय नाव : Accipiter badius ( अक्सिपीटर बॅडियस ) 
लांबी : ३० ते ३६ सें.मी. 
आकार : गावकावळ्यापेक्षा लहान 

 




          याचं इंग्रजी नाव इतकं रूळलंय की, याला शिक्रा  म्हणूनच ओळखतात. ' शिक्रा ' हा उर्दू भाषेतून घेतलेला पर्शियन शब्द आहे. त्याचा हिंदी भाषेतील अर्थ शिकारी असा आहे. हा एका जातीचा शिकारी पक्षी आहे. शिकारी पक्षी म्हणजे जिवंत भक्ष्याची शिकार करणारा. पानझडीचं जंगल, खेड्यापाड्यांच्या आसपास असणाऱ्या आंब्याच्या बागा आणि शेतीच्या प्रदेशात शिक्रा दिसतो. पुष्कळदा हा पक्षी आपल्याला प्रत्यक्ष दिसण्याआधी पक्ष्यांनी त्याला हेरलेलं असतं. बुलबुल, सातभाई, वेडे राघू, साळुक्या, पारवे हे पक्षी शिळ्याची चाहूल लागताच घाबरून उडायला लागतात किंवा बसल्या जागेवरूनच भराभर इशारेवजा आवाज काढतात. अशा वेळी जर आसपास नीट लक्ष देऊन पाहिलं, तर कधी गोलाकार पंखांची उघडझाप करत तर कधी संथपणे तरंगत येणारा शिक्रा दिसतो.तीक्ष्ण नजर, बाकदार चोच आणि धारदार नख्या यांची देणगी मिळालेला शिक्रा सरडे, सापसुरळ्या, खारी, पक्षी यांची शिकार करतो. आकार आणि रंग यावरून या पक्ष्याच्या चार उपजाती किंवा भौगोलिक वंशांची नोंद करण्यात आली आहे. पाठीकडून निळसर राखी आणि पोटाकडून पांढऱ्या रंगाच्या या पक्ष्याच्या छातीवर आणि पोटावर, पाण्यावर नाजूक लहरी उठाव्यात तशा तांबूस तपकिरी रेषा दिसतात. मादी नरापेक्षा मोठी असते  शिवाय मादीचा रंग पाठीकडून तपकिरी असतो. साधारण मार्च ते जून या काळात शिक्रा घरटं करतो. त्याचं घरटं कावळ्याच्या घरट्यासारखंच असतं. शिक्रा बऱ्याचदा आंब्याच्या झाडात घरटं करतो, अशी झाडं अगदी शहराच्या मध्यभागी, गजबजलेल्या भागात असतील तरी चालतात. जिथून नजीकचा परिसर नीट दिसेल, भक्ष्य असलेल्या पशुपक्ष्यांची हालचाल निरखता येईल अशी झाडावरची मोक्याची जागा बघून शिक्रा एकचित्त बसून राहतो. संधीची वाट बघत नुसतं बसून राहण्यात तासन्तास जातात. एखाद्या पट्टेवाल्या खारीचं किंवा सातभाईचं लक्ष्य पक्क झालं की त्यांना बेसावध गाठून पंजांमध्ये पकडायचं आणि आवळून ठार करायचं अशी पद्धत वापरून तो शिकार करतो. चिमणीसारखा पक्षी मारला असेल तर पिसं उपटून टाकल्यानंतर पूर्ण पक्षी एका झटक्यात गिळून टाकला जातो. पायही आख्खेच्या आख्खे खाल्ले जातात. भक्ष्याचे मोठे तुकडे गिळता यावेत म्हणून शिकारी पक्ष्यांचीअन्ननलिका रुंद असते. टोळ - नाकतोडे - गवळणींपासून बेडकांपर्यंत, सरडे - सापसुरळ्यांपासून चिमण्या - सातभाईपर्यंत आणि रानउंदरांपासून पट्टेदार खारीपर्यंत शिक्र्याच्या भक्ष्यांमध्ये विविधता दिसून येते. एकदा एका शिक्र्याने पाच पट्ट्यांच्या खारीची शिकार केली. त्याला पाहताच एका डोमकावळ्याने चाचेगिरी करण्याचा प्रयत्न केला. मारलेलं सावज पंजात धरून घाबरलेला शिक्रा डोमकावळ्याला पाहताच कडुनिंबाच्या फांदीवर जरासा सावरून बसला. तेवढ्यात दुसरा डोमकावळा तिथे आला. दोन बाजूंना दोन डोमकावळे आणि मध्ये शिक्रा हे दृश्य १० ते १५ मिनिटं तसंच होतं. शेवटी घाडस करून शिक्रा उडाला. हवेतल्या रस्त्यावरचे अडथळे चुकवत चुकवत झाडाझाडांतून पसार झाला. डोमकावळे फार काळ त्याचा पाठलाग करू शकले नाहीत. जमीन तापून हवा मोकळी झाली की शिक्रा पंख पसरतो. हवेत छोटी छोटी वर्तुळ रेखत टप्प्याटप्प्याने वर चढतो. अशा पद्धतीने उंच आकाशात विहार करणारा शिक्रा चिमुकल्या ग्लायडरसारखा दिसतो. दुर्बिणीतून पाहिलं तर त्याच्या पंखांच्या खालच्या बाजूला आणि बगलांवर असलेले पट्टे, छाती आणि पोटावरच्या नाजूक रेषा, शेपटीवरचे आडवे पट्टे आणि गडद रंगांची उड्डाणपिसांची टोकं ही वैशिष्ट्यं लक्षात येतात. उडताउडताच तो अधूनमधून आव्हान दिल्यासारखा , रानवट आवाज काढतो - ' टिट्यू - टिट्यू - टिट्यू ! ' भरपूर झाडं असलेल्या शहरातल्या एखाद्या भागात किंवा मळ्यांमध्ये शिक्र्याचा हा आवाज बऱ्याचदा ऐकू येतो. भंडारा जिल्ह्यातील पानझडीच्या जंगलात असलेल्या एका झऱ्यावर भर उन्हाळ्यात लपण बांधून मी शिक्याची काही निरीक्षण केली. तेव्हा लक्षात आलं की, हा पक्षी केवळ पाणी पिण्यासाठी झऱ्यावर येत नाही तर उष्णतानियमन ( Thermoregulation ) करणं ही त्याची महत्त्वाची गरज असते. उष्णतानियमन म्हणजे विशेषतः पोटाचा आणि गुदद्वाराचा भाग पाण्यात बुडवून शरीराचं तापमान कमी करणं. सतत निरीक्षण केल्यामुळे आणि फोटो काढल्यामुळे माझ्या ओळखीचा झालेला एक शिक्रा एकाच दिवसात आठ तासांमध्ये चार वेळा पाण्यावर आला . पाण्यावर नियमितपणे येणाऱ्या शिक्यांच्या वेळा जवळजवळ ठरलेल्या होत्या . पाणवठ्यावर येण्यापूर्वी शिक्रा हवेत आडव्यातिडव्या रेघा मारल्यासारखा अतिशय वेगात उडतो , पाहणी करतो आणि मगच खाली उतरतो . बेसरा किंजा चिमणबाजासारखा दुसरा , त्याच्यापेक्षा आकाराने मोठा असलेला शिकारी पक्षी येताच तो घाबरून उडतो आणि त्याच्यापेक्षा सवाई अशा पक्ष्याला जागा करून देतो.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

जांभळा शिंजीर Purple Sunbird (Nectarinia asiatica)

साळुंकी Common Myna (Acridotheres tristis)

पिंगळा Spotted Owlet (Athene brama)