Posts

दयाळ

Image
इतर मराठी नावं : डोमिंगा, सुईणबुड्डी, खोडाकुशी, वट्टी, कोडामल्ली  सध्याचं इंग्रजी नाव : Oriental Magpie Robin (ओरिएंटल मॅगपाय रॉबिन)  आधीची इंग्रजी नावं : Dayal (दयाल), Magpie Robin (मॅगपाय रॉबिन)  शास्त्रीय नाव : Copsychus saularis (कॉपसिकस सॉलॅरिस)  लांबी : २३ सें.मी.  आकार : बुलबुलापेक्षा मोठा            सरसरत उंच गेलेल्या गगनजाईच्या हिरव्या मनोऱ्याच्या टोकाशी बसून 'उस्ताद दयाल खाँ' गाणं गात असतात. एका मागून एक गोड सुरांच्या माळाच त्यांच्या कंठातून बाहेर पडत असतात. या गवयाची गाण्याची बैठक पक्की ठरलेली असते. त्यामुळे अपॉइंटमेंट घेतल्यासारखं त्याला पुन्हा पुन्हा पाहता येतं. पक्ष्यांमधला सुप्रसिद्ध गायक श्याम (White - rumped Shama) , a (Indian Robin) tror ferfert (Black Redstart) यांच्या फॅमिलीतल्या दयाळाची ओळख पटवणं अगदी सोपं आहे. नर काळाकुळकुळीत आणि पोटाशी पांढरा शुभ्र, तर मादी राखाडी रंगाची असते. परसबागा, उद्यानं, फळबागा, आमराया, गावखेड्यांच्या आसपासचा झाडझाडोरा आणि पानगळीचं जंगल हा त्याचा अधिवास आहे. दयाळ हा एक सहजपणे दिसणारा स्...

साळुंकी Common Myna (Acridotheres tristis)

Image
इतर मराठी नावं : शाळू, लांडी  इंग्रजी नाव : Common Myna ( कॉमन मैना )  शास्त्रीय नाव : Acridotheres tristis ( अक्रिडोथिरिस ट्रिस्टिस )  लांबी : २२.५ सें.मी.  आकार  : कबुतरापेक्षा लहान            काळाच्या ओघात माणसाशी मैत्री करणाऱ्या कावळा - चिमणीसारखीच ही साळुकी. डोळ्यांभोवतीच्या पिवळ्याजद कातडीमुळे साळुकी पटकन ओळखता येते. शेतकऱ्यांच्या नांगरामागे किंवा माळावर गाईगुरांच्या पायांमधून ठुमकत चालणारी आणि किडेमकोडे टिपणारी साळुकी धिटाईने एखाद्या बंगल्याच्या आवारातही येते. गहू, ज्वारी, तूर आणि डाळिंबावरच्या उंट अळीचा समाचार घेत शेतकऱ्यांना मदत करते. थव्यांनी राहणारा हा पक्षी पळस, पांगारा, काटेसावर ही झाडं फुलली की मधुरसासाठी या झाडांना हमखास भेट देतो. ऐन उन्हाळ्यात दुपारी साळुकी एखाद्या झाडावर विश्रांती घेण्यासाठी बसते आणि स्वगत म्हटल्यासारखे ढंगदार आवाज काढते.' क्रो - क्रो - क्रो - क्रो ! चॉ - चॉ - चाँ - चाँ ! ट्रॅची - ट्रॅची - ट्रॅची ! ' दोन साळुक्या एकमेकींच्या शेजारी बसलेल्या असताना जर एकीला उडायचं असेल तर ती ' पिळलॉक ! ' असा गोड ...

सुभग Common lora (Aegithina tiphia)

Image
दुसरं मराठी नाव : कमका बोदल इंग्रजी नाव : Common lora ( कॉमन आयोरा )  शास्त्रीय नाव : Aegithina tiphia ( एगीथिना टिफिया )  लांबी : १४ सें.मी.  आकार : चिमणीएवढा            हा एक छोटासा सुंदर पक्षी आहे. पाठीकडून काळ्या आणि पोटाकडून पिवळ्या रंगाच्या सुभगाच्या पंखावर दोन पांढरे पट्टे असतात. शेपटी काळी असते. मुख्यतः झाडावर राहणारा हा पक्षी अळ्या, कीटक आणि कोळी खातो. पानझडीच्या जंगलात, शहरातील भरपूर झाडं असलेल्या भागांमध्ये, आंबा, चिंच, कडुनिंबाच्या उपवनांमध्ये सुभगाची वेड लावणारी शीळ ऐकू येते. सरासरी पाऊसमान ३०० मिलिमीटर असलेल्या रखरखीत प्रदेशातही सुभग दिसतो. शेतांच्या बांधावर लावलेल्या आणि परिसरात उगवून आलेल्या बाभूळ, शेवगा, कडुनिंब ,हादगा, चिंच, बोर, आंबा अशा झाडांच्या हिरव्या पुंजक्यांमध्ये सुभगाला आपली जागा सापडते. विणीच्या हंगामात मादीला आकर्षित करण्यासाठी आणि परिसरातल्या इतर नरांना इशारा देण्यासाठी सुभगाचा नर एक प्रकारचा संकेत ( Courtship Display ). अशा वेळी तो पाठीवरच्या पांढऱ्या शुभ्र पिसांचा गोंडा फुलवून पंखांची जलद फडफड करत सरळ रेषेत ...

वेडा राघू Green Bee-eater (Merops orientalis)

Image
इतर मराठी नावं : बहिरा पोपट, तेलंगी, पतेरी, पातूर, पतरिंगा, पानरागो, कंगन  सध्याचं इंग्रजी नाव : Green Bee-eater ( ग्रीन बी-ईटर )  आधीचं इंग्रजी नाव : Small Green Bee-eater ( स्मॉल ग्रीन बी-ईटर )  शास्त्रीय नाव : Merops orientalis ( मेरॉप्स ओरिएंटॅलिस )  लांबी : १६ ते १८ सें.मी.  आकार : चिमणीएवढा Add caption            एखादया बाभळीच्या झाडाच्या फांदीवरून हवेत झेप घेणारा, उडणाऱ्या किड्याच्या हालचालीबरहुकूम उलटसुलट गिरक्या घेणारा आणि किडा पकडताच पंख पसरून संथपणे तरंगत पुन्हा त्याच फांदीवर येऊन बसणारा वेडा राघू रानोमाळ फिरणाऱ्या  पोरांना  चांगलाच माहीत असतो. त्याला ते ' भैरा पोपट  ' या नावाने ओळखतात. शेतीवाडी, चराऊमाळरानं, विरळ जंगलं ही ते आढळण्याची मुख्य ठिकाणं, हिरव्या रंगाच्या या सुंदर पक्ष्याच्या शेपटीमधली दोनच पिसं जास्त लांब असतात. या पिसांचा निम्मा भाग नाजूक तारांसारखा दिसतो. हे पक्षी जोडीने किंवा लहान थव्यांनी विजेच्या तारा, कुंपणावर, झाडाच्या फांद्यांवर बसून आपली शिकार टिपण्यात दंग असतात. हवेत झेपावत एखादा ...

पिंगळा Spotted Owlet (Athene brama)

Image
इतर मराठी नावं : घोगड, घोघो पिंजरा, पिंजरला, पिंजल  इंग्रजी नाव : Spotted Owlet (स्पॉटेड आऊलेट)  शास्त्रीय नाव : Athene brama  लांबी : २१ सें.मी.  आकार : साधारण साळुंखीएवढा            राखट - तपकिरी अंगावर पांढरे ठिपके असणारं हे एक छोटं घुबड आहे. घुबडांना दिवाभीत किंवा दिवांध असंही म्हणतात. पिंगळ्याला साधारण सपाट चेहऱ्यावर समोरच्या बाजूला खूप मोठे, वाटोळे डोळे असतात. याचा मुख्य फायदा असा की त्यामुळे त्याला अंतराचं ज्ञान अचूक होतं. दुसऱ्या कोणत्याही पक्ष्यापेक्षा घुबडाची व्दिनेत्री  दृष्टी ( Binocular Vision ) अधिक व्यापक असते. जिवंत भक्ष्य पकडत असल्यामुळे त्यांच्या दृष्टीने व्दिनेत्री  दृष्टीचं महत्त्व अनन्यसाधारण असतं. बाजूचं किंवा मागचं बघण्यासाठी घुबडं गर्रकन डोकं वळवतात. खेड्यापाड्यांमधीलशेत - शिवारं, जुनी झाडं, पडक्या इमारती, नदीकाठची बाभळबनं, शहरांमधील बागा, उद्यानं आणि डोंगर-टेकड्यांवरील विरळ झाडी या पिंगळ्यांच्या राहण्याच्या जागा, पिंगळे जोडीने राहतात किंवा ७-८ जणांचा कुटुंबथवा काही वेळेस एकत्र राहताना दिसतो. टोळ, भ...

चश्मेवाला Oriental White-eye (Zosterops palpebrosus)

Image
दुसरं मराठी नाव : चाळिशीवाला इंग्रजी नाव : Oriental White - eye (ओरिएंटल व्हाइट - आय)  शास्त्रीय नाव : Zosterops palpebrosus (झूस्टेरॉप्स पॅल्पेब्रोसस)  लांबी : १० सें.मी.  आकार : चिमणीपेक्षा लहान            काहीसं विचित्र नाव असलेला हा छोटासा पक्षी बागा, उद्यानं, फळबागा, आमराया, उपवनं, पानझडीची जंगलं आणि खारफुटींमध्ये आढळतो. चार झाडांची निगा राखून घराशेजारी फुलवलेल्या छोट्या बागेतही तो हजेरी लावतो. राखी वल्गुली, शिंजीर, जांभळा शिंजीर, सुभग, तुरेवाला वल्गुली, राखी वटवट्या, शिंपी, ब्राउन चिफचॅफ या चिंट्यापिंट्यांच्या मंडळाचा सभासद असलेला चश्मेवाला जरा लांब असेल तर दुर्बिणीशिवाय ओळखणं अवघड आहे. हिरव्या - पिवळ्या रंगाच्या या पक्ष्याच्या डोळ्यांभोवती चश्म्यासारखी दिसणारी पांढरी कडी असतात. त्यामुळे एकदा का त्याचा ' चश्मा ' दिसला की ओळख पक्की झाली असं समजावं. जवळजवळ सगळं आयुष्य झाडावर काढणारा चश्मेवाला कधीही एकटा दिसत नाही.            हा मिश्राहारी पक्षी लहानसहान किडे, फुलांतला मधुरस आणि फळांवर गुजराण करतो. य...

कोतवाल Black Drongo ( Dicrurus macrocercus )

Image
इतर मराठी नावं : गोचिडखाऊ, गोचिडघुम्मा, काळवाण्या, गोचा, कावळी, काळा गोविंद, कोळसा, काळेट इंग्रजी नाव : Black Drongo ( ब्लॅक ड्रॉगो ) शास्त्रीय नाव :  Dicrurus macrocercus  ( डायरस मॅक्रोसरकस )  लांबी : २८ सें.मी.  आकार : बुलबुलापेक्षा मोठा             चमकदार काळा रंग आणि लांबलचक दुभंगलेली शेपटी असणारा कोतवाल हालचाली करणारा आणि ससाणे, वळे, घारी तसंच गरुडांसारख्या मोठ्या भक्षक पक्ष्यांचा वेगाने पाठलाग करून त्यांना हुसकावणारा हा कोतवाल पाहिल्यावर म्हणावसं वाटतं की ' छाती असावी तर कोतवालाची ! ' शेताच्या कुंपणावर, झाडाच्या उंच शेंड्यावर, विजेच्या किंवा टेलिफोनच्या तारेवर बसून हा किड्यांवर, नाकतोड्यांवर नजर ठेवून असतो. नाकतोडे, उडणाऱ्या वाळव्या, मुंगे, टोळ आणि मधमाश्यांबरोबरच पळसाच्या फुलातील मधुरसही तो आवडीने चाखतो. शेतीला हानिकारक असलेले कीटक खात असल्यामुळे तो शेतकऱ्यांचा मित्र आहे. एप्रिल ते ऑगस्ट या काळात हे पक्षी घरटी करतात. म्हशीच्या पाठीवर बसून मजेत फिरणारा कोतवाल खेड्यापाड्यात ' गोचिडखाऊ ' म्हणून परिचित आहे. शेतामध्ये राव सुरू असत...

खंडया White - throated Kingfisher (Halcyon smyrnensis)

Image
इतर मराठी नाव : बंड्या धीवर, डुबकन्या, ढीव, लालचाचू.  इंग्रजी नाव : White-throated Kingfisher (व्हाईट -थ्रोटेड किंगफिशर)   शास्त्रीय नाव : Halcyon smyrnensis (हॅल्सिऑन स्मिरनेन्सिस)  लांबी : २८ सें.मी.  आकार : साळुंखीपेक्षा  मोठा    नदीच्या काठावर असलेल्या शहरातील वसाहतींमध्ये सूर्योदयाच्या वेळी एक ललकारीसारखा स्पष्ट आवाज ऐकू येतो. एकदा ऐकला की कधीही विसरला जाणार नाही असा हा खंड्याचा आवाज दुसऱ्या कोणत्याही पक्ष्याच्या आवाजासारखा नसतो. हा परिचित आवाज म्हणजे खंड्या पक्ष्याने एक प्रकारे स्वतःची केलेली जाहिरात असते. मादीपर्यंत तो आवाज पोहोचवून तिला आकर्षित करणं आणि त्याचा इलाखा कोणता आहे, हे परिसरातल्या दुसऱ्या नराला सूचित करणं असे या आवाजाचे दोन अर्थ असतात. शहरातली वाहतूक आणि वर्दळीचे कर्णकटु आवाज सुरू व्हायच्या आधी खंड्या उंच इमारतीच्या सर्वांत टोकाशी असलेल्या टीव्हीच्या अँटेनावर बसून ' किलिलिलि ! ' असा लांबलचक आवाज काढतो. आवाज काढण्यासाठी त्याने गाठलेली वेळ आणि जिथे बसून आवाज काढला जातो त्या उच्चासनामुळे खंड्याला दुहेरी फायदा होतो....

Popular posts from this blog

जांभळा शिंजीर Purple Sunbird (Nectarinia asiatica)

साळुंकी Common Myna (Acridotheres tristis)

पिंगळा Spotted Owlet (Athene brama)