दयाळ

Image
इतर मराठी नावं : डोमिंगा, सुईणबुड्डी, खोडाकुशी, वट्टी, कोडामल्ली  सध्याचं इंग्रजी नाव : Oriental Magpie Robin (ओरिएंटल मॅगपाय रॉबिन)  आधीची इंग्रजी नावं : Dayal (दयाल), Magpie Robin (मॅगपाय रॉबिन)  शास्त्रीय नाव : Copsychus saularis (कॉपसिकस सॉलॅरिस)  लांबी : २३ सें.मी.  आकार : बुलबुलापेक्षा मोठा            सरसरत उंच गेलेल्या गगनजाईच्या हिरव्या मनोऱ्याच्या टोकाशी बसून 'उस्ताद दयाल खाँ' गाणं गात असतात. एका मागून एक गोड सुरांच्या माळाच त्यांच्या कंठातून बाहेर पडत असतात. या गवयाची गाण्याची बैठक पक्की ठरलेली असते. त्यामुळे अपॉइंटमेंट घेतल्यासारखं त्याला पुन्हा पुन्हा पाहता येतं. पक्ष्यांमधला सुप्रसिद्ध गायक श्याम (White - rumped Shama) , a (Indian Robin) tror ferfert (Black Redstart) यांच्या फॅमिलीतल्या दयाळाची ओळख पटवणं अगदी सोपं आहे. नर काळाकुळकुळीत आणि पोटाशी पांढरा शुभ्र, तर मादी राखाडी रंगाची असते. परसबागा, उद्यानं, फळबागा, आमराया, गावखेड्यांच्या आसपासचा झाडझाडोरा आणि पानगळीचं जंगल हा त्याचा अधिवास आहे. दयाळ हा एक सहजपणे दिसणारा स्...

सर्पदंश

सर्पदंश 
पावसाचे दिवस आहेत . या काळात सर्पदंशाच्या घटना वारंवार घडतात . सर्पदंश कसा ओळखावा आणि त्यावर तातडीचे उपाय काय आहेत याबाबत या लेखात लिहिण्याचा प्रयत्न केला आहे .

 • विषारी साप : भारतात ५५० प्रकारचे साप आढळतात . यातील फक्त  Russell's viper ,Common krait , saw-scaled viper, Indian cobra हे अत्यंत विषारी आहेत आणि अन्य १० जातीचे साप विषारी गणले जातात . इतर प्रकारचा साप चावल्यास माणसाचा मृत्यू होईलच असे नाही . परंतु साप चावला या भितीनेच हृदयविकाराचा झटका येतो आणि मृत्यू होतो.



2. मण्यार common krait (Bungarus caeruleus)The Dark Knight: Enigma of the Common Krait | RoundGlass | Sustain





• सर्पदंशाच्या खुणाः विषारी सापामध्ये दोन मोठे व आतील बाजूस वळलेले विषदंत असतात आणि जबड्यातील इतर दात लहान असतात . ज्या वेळी विषारी साप चावा घेतो , तेव्हा त्याच्या दातांच्या खुणा . . अशा ठळकपणे उमटतात , विषदंतांचे दोन मोठे खोल व्रण ठळकपणे दिसतात . परंतु ज्या वेळी बिनविषारी साप चावतो , त्यावेळी त्याच्या दातांच्या बारीक दातांच्या खुणा उमटलेल्या दिसतात . काही वेळा अशा खुणा अस्पष्ट उमटतात.


 • सापाच्या विषाचे दोन प्रकार :
१. न्यूरोटॉक्सिक ( तंत्रिका विषाक्त ) : या विषाचा परिणाम तंत्रिका तंत्रावर होतो . नाग व मण्यार सापातील विष या प्रकारचे असते . 
.हीमोटॉक्सिक ( रक्तविषाक्त ) : या विषाचा परिणाम रक्ताभिसरण तंत्रावर होतो . या विषाने रक्तातील तांबड्या ( रक्तरुधिर ) कोशिका व लहान रक्तवाहिन्या यांचा नाश होतो . फुरशाचे व घोणसाचे विष हीमोटॉक्सिक असते . हे विष अम्लधर्मी असून ते वाळविल्यास त्यापासून सुईसारखे स्फटिक तयार होतात . नागाच्या विषामध्ये न्यूरोटॉक्सिन व फुरशाच्या विषामध्ये हेमोलायसिन हे प्रथिन आढळते . सर्प विषामध्ये विविध प्रकारची एंझाइम , फॉस्फोलायपेज - ए , कोलिनएस्टरेज , ऑफिओ अमिनो ऑक्सिडेज , न्यूक्लिएज , हायड्रोनायडेज , पायरोफॉस्फेटेज इ . घटक आढळतात . 

• प्राणघातक विषाचे प्रमाण : एका व्यक्तीला प्राणघातक ठरू शकणाऱ्या विषाचे प्रमाण पुढीलप्रमाणे आहे . 
1. नाग १२ मिग्रॅ.
2. घोणस १५ मिग्रॅ.
3.मण्यार ६ मिग्रॅ.
4. फुरसे ८ मिग्रॅ.

 • विषबाधेची लक्षणे
 सर्पदंशामध्ये पायावरील दंशाचे प्रमाण अधिक असून हातावर दंशाचे प्रमाण कमी आहे . पायाकडून मेंदूकडे रक्त वाहून नेणाऱ्या रक्तवाहिनीवर दंश झाला व पुरेसे विष शरीरात गेले तर व्यक्ती २-३ मिनिटांत मरण पावते . फुरशाचे विष रक्ताभिसरण तंबात मिसळले , तर ती व्यक्ती चटकन मरण पावते . बिनविषारी सापाच्या चाव्यामुळे मानसिक धक्का व ताण यांमुळे व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो . विषारी सापाला घाईगडबडीमुळे वा चावा घेताना अंदाज चुकल्याने पुरेसे विष टोचणे शक्य होत नाही . व्यक्तीला विषबाधा झाल्यास पुढील लक्षणे दिसतात.  

नाग : 
१ ) दंशाच्या जागी सहा ते आठ मिनिटांत तांबूस पुरळ दिसू लागते आणि त्या जागी खाज सुटते व वेदनांची जळजळ सुरु होते . 
२ ) सुमारे २५ मिनिटांनी रोग्यास झोप आल्यासारखे वाटते ; गुंगी येऊ लागते ; हालचाल करण्याची अगर चालण्याची इच्छा राहत नाही .
 ३ ) दंशानंतर ३५-५० मिनिटांनी तोंडातून लाळ बाहेर पडते ; ओकाऱ्या सुरू होतात ; शरीर जड होते ; जीभ व घसा सुजतो , त्यामुळे बोलता येत नाही व अन्न खाता येत नाही .
४ ) सुमारे दोन तासांनी अर्धागवायूची बाधा होते ; श्वसनक्रिया मंद होत जाते ; हृदयाचे ठोके जलद पडू लागतात . रुग्ण शुध्दीवर असला , तरी तो बोलू शकत नाही , 
५ ) श्वसनक्रिया आकडी येऊन थांबते व त्यापाठोपाठ हृदयक्रिया बंद पडते . 

मण्यार : 
१ ) दंशाच्या जागी तांबूस पुरळ उमटते ; परंतु त्या जागी सूज किंवा जळजळणाऱ्या वेदना होत नाहीत . 
२ ) आकडीचे झटके सौम्य असतात ; सुस्ती व गुंगी तीव्र स्वरूपाची असते . 
३ ) रुग्णाच्या मूत्रामध्ये पांढरी खर ( श्वतक ) सापडते . 
४ ) सुमारे सहा तासानंतर पोटात व सांध्यांना अतिशय वेदना होतात . 

घोणस व फुरसे
१ ) दंशाच्या जागी सुमारे आठ मिनिटांत तीव्र वेदना व जळजळ जाणवू लागते . दंशाभोवतालची जागा सुजून लाल व दुखरी होते 
२ ) सुमारे पंधरा मिनिटांच्या आत सूज वाटू लागते ; जखमेतून रक्त व दूषित स्राव वाहू लागतो . 
३ ) तीव्र वेदना सुरू होतात ; अंगावर काटा उभा राहतो ; ओकाऱ्या होतात ; घाम सुटतो ; डोळ्यांच्या बाहुल्या विस्फारल्या जातात व त्या प्रकाशाला प्रतिसाद देत नाहीत . 
४ ) एक ते दोन तासांत रुग्णाची शुध्द हरपते .
५ ) जखमेतून पुरेसे रक्त वाहून गेल्यावर जखमेच्या जागी सूज येते ; ती जवळच्या भागात पसरते ; जखमेच्या जागी पू होतो व त्वचा कुजू लागते . 
६ ) आतड्यातून व दातांच्या हिरड्यांतून रक्त वाहू लागते ,  

• प्रथमोपचार 
सर्पदंश झाल्यावर सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे डॉक्टरी सल्ल्याने केलेले उपचार . दंश झाल्यानंतर असे उपचार तत्काळ शक्य होतातच असे नाही . अशा वेळी डॉक्टरांकडे जाईपर्यंत प्रथमोपचार महत्त्वाचे असतात . दंशाच्या ठिकाणी काप घेऊन तेथील रक्त वाहू देण्याची पद्धत पूर्वी रूढ होती . त्यामागे दंशाच्या ठिकाणचे विष रक्ताबरोबर वाहून जाते असा समज होता . परंतु तसे करू नये . मुख्य म्हणजे काप घेणे ही बाब रुग्णासाठी वेदनादायक असते . काप घेतल्यावर प्रत्यक्षात अत्यल्प विष वाहून जाते आणि रक्त वाहून गेल्यामुळे त्या माणसाचे नुकसानच जास्त होते . कित्येकदा साप बिनविषारी असतात किंवा विषारी सापाचे विष चाव्याच्या वेळी टोचले गेले नसण्याचीही शक्यता असते .

 सर्पदंश झाल्यावर पुढील गोष्टी कराव्यात :
१. जखम स्वच्छ धुवावी .
२. चित्रात दाखवल्याप्रमाणे रुंद क्रेप बँडेज दंश झालेल्या अवयवास बांधावे . बँडेज उपलब्ध नसल्यास कापडाचे ४ इंच रुंदीचे पट्टे वापरावेत . दंश झालेला भाग स्थिर ठेवावा . त्यासाठी बँडेज बांधताना फळीचा आधार द्यावा . डॉक्टरांकडे पोचेपर्यंत हे बँडेज काढू नये . घोणस किंवा फुरसे चावले असेल तर मात्र बँडेज बांधू नये . 
३. सर्पदंश झालेली व्यक्ती मानसिकदृष्ट्या खचण्याची शक्यता असते . त्यास धीर द्यावा व उबदार ठेवावे पण त्यासाठी अल्कोहोल पाजू नये . चालणे , बोलणे असे कोणतेही श्रम करू न देता त्यास शांत राहण्यास सांगावे . 
४. डॉक्टरांकडे गेल्यावर दंश झालेल्या व्यक्तीस दमा अथवा कोणत्याही प्रकारची ऍलर्जी असल्यास प्रथम सांगावे . ५. चावलेला साप मारून डॉक्टरांकडे नेऊ नये . 



Comments

  1. Nice important information

    ReplyDelete
  2. Nice.....informational content....hope you share much more interesting facts in future too....... all the best for future....☺

    ReplyDelete
  3. Really nice sagar and best luck for future...🎀

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

साळुंकी Common Myna (Acridotheres tristis)

जांभळा शिंजीर Purple Sunbird (Nectarinia asiatica)

FISH DIVERSITY IN NIRA RIVER