पक्षी कसे निर्माण झाले, पहिला पक्षी कोणता, या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा मोठा खटाटोप जगभर सुरू असून पुरातत्त्वशास्त्रज्ञ, प्राणिशास्त्रज्ञ आणि पक्षिशास्त्रज्ञ यासाठी अखंड प्रयत्न करत आहेत. जगातल्या बऱ्याचशा संशोधकांना पक्ष्यांची उत्क्रांती प्राचीन सरपटणाऱ्या प्राण्यांपासून झाली, हे मान्य आहे. अलीकडे चीनच्या उत्तरेकडील लिएओनिंग (Liaoning) प्रांतात झालेल्या जीवाश्मांच्या (अश्मिभूत प्राणी) अभ्यासामुळे पक्ष्यांच्या उत्क्रांतीवर अधिक प्रकाश पडला. यामध्ये सापडलेले जीवाश्म - यिक्सिअन फॉर्मेशन (Yixian Formation) १४.५ ते १२.५ कोटी वर्षं जुने आहेत. या उत्खननात मिळालेल्या माहितीनुसार सायनोसॉरेप्टरिक्स प्रायमा (Sinosauropteryx prima) हा डायनोसॉर आणि आधुनिक जगातल्या पक्ष्यांमधला दुवा सापडला.
 |
(Sinosauropteryx prima) ©Google image |
पक्ष्यांची उत्क्रांती मॅनिरॅपोरियन थेरोपॉड्स (Manirapporian Theropods) या डायनोसॉरपासून झाली याचा जुरासिक (Jurassic) आणि क्रेटॅशस (Cretaceous) काळातील भक्कम पुरावा चीनमध्ये मिळाला आहे. जुरासिक कालखंडाच्या उत्तरार्धातल्या पक्ष्यांचा आर्किओप्टेरिक्स लिथोग्राफिका (Archaeopteryx lithographica) हा सर्वांत पहिला जीवाश्म १८६१मध्ये जर्मनीतील बव्हेरिया (Bavaria) प्रांतात सापडला. Arkhaios म्हणजे Ancient (प्राचीन) आणि Pterux म्हणजे पंख.
 |
(Archaeopteryx lithographica) the transitional fossil ©source wikipedia |
आर्किओप्टेरिक्स हा साधारण छोट्या तुर्की कोंबडीपेक्षा लहान असावा असा अंदाज आहे. पंख आणि पिसं असलेल्या या सरपटणाऱ्या प्राण्याच्या तोंडात दात होते. त्याची शेपूट हाडांनी बनलेली होती. सध्या जीवाश्म लंडन येथील ब्रिटिश म्युझिअममध्ये ठेवलेला आहे. थोडक्यात, गेल्या समारे पंधरा कोटी वर्षांपासून पक्षी आकाशात उडत असून डायनोसॉरच्या एका लहान जातीपासून पक्ष्यांची उत्क्रांती झाली. पक्षी म्हणजे दोन पायांचे, पिसं असलेले प्राणी. पक्ष्यांना पाठीचा कणा असतो. हे उष्ण रक्ताचे प्राणी असून अवतीभवती असलेल्या तापमानाशी तुलना केल्यास त्यांच्या शरीराचं तापमान जवळजवळ स्थिर किंवा एकसारखं असतं. याउलट साप, बेडूक किंवा मासे या थंड रक्ताच्या प्राण्यांच्या शरीराचं तापमान सभोवताली असलेल्या तापमानाप्रमाणे बदलत असतं. म्हणजे आजूबाजूचा परिसर थंड झाला की त्यांच्या शरीराचं तापमान कमी होतं आणि पारा वर चढला की, या प्राण्यांच्या शरीराचं तापमान वाढतं. म्हणूनच साप, सरडे, घोरपड यांसारखे सरपटणारे प्राणी सकाळी उन्हाला बसतात. सूर्याची उष्णता आपल्या अंगात घेतात. चार पायांच्या प्राण्यांच्या पुढच्या दोन पायांची किंवा माणसाच्या संदर्भात सांगायचं तर दोन हातांची आणि पक्ष्यांच्या पंखांची तुलना करता येईल. पक्ष्यांमध्ये पुढच्या दोन अवयवांचं पंखांमध्ये रूपांतर झालेलं असतं. त्यामुळेच पक्षी उडू शकतात. उडण्याच्या क्षमतेमुळे पक्षी पृथ्वीतलावरील इतर सर्व प्राण्यांपेक्षा वेगळे उठून दिसतात. याला अपवाद म्हणजे पेंग्विन, किवी, एम, कॅसॉवरी, शहामृग, तसेच गॅलॅपेगॉस बेटांच्या समूहात दिसणारा पाणकावळा, हिया. अर्थात वाघळंदेखील (Bats) उडू शकतात. परंतु वाघळांच्या अंगावर पिसं नसतात, तर केस वाघूळ असतात. वाघळांचे पंख एक प्रकारच्या पातळ पटलाने (Membrane) बनलेले असतात. वाघळं हे सस्तन प्राणी आहेत. पक्ष्यांच्या अंगावरच्या पिसांमुळे त्यांचं अतिथंडी किंवा अतिउष्णतेपासून संरक्षण होतं व शरीराचं तापमान स्थिर राहतं. माणसाच्या शरीराचं तापमानसुद्धा स्थिर असतं पण आपण स्वतःचं रक्षण करण्यासाठी अंगावर कपडे घालतो. पक्ष्यांच्या अंगांवरची पिसं कपड्यांसारखं काम करतात. पक्ष्यांच्या शरीराचं तापमान साधारणपणे ३८ ते ४४ अंश सेल्सिअस असतं. माणसाच्या शरीराचं तापमान ३७ अंश सेल्सिअस असतं. आर्क्टिक प्रदेशात उणे ४० अंश सेल्सिअस किंवा रणरणत्या वाळवंटात ६० अंश सेल्सिअस तापमानातही पक्षी राह शकतात. ज्या ठिकाणी परेसं खाद्य उपलब्ध आहे अशा कोणत्याही प्रदेशात पक्षी राह शकतात.
म्हणूनच पक्षी हा पृथ्वीवरचा यशस्वी प्राणिगट आहे. पक्षी अंडी घालतात. अंडी आणि पिल्लांच्या रक्षणासाठी घरटी बांधतात आणि दिसणं या दोन क्षमतांचा पक्ष्यांमध्ये विकास झालेला असतो. माणसाच्या तर पक्ष्यांचं रंगांचं ज्ञान खूपच विकसित झालेलं आहे. त्यांचं चवीचं ज्ञान मात्र कमी विनर
झालेलं असतं. बऱ्याच पक्ष्यांच्या जिभांवर चवीच्या कळ्या (Taste Buds) शंभरपेक्षा कमी असतात. माणसात त्या सुमारे दहा हजार असतात. पक्ष्याना वास येत नाही मात्र
अपवाद आहे. उत्तर अमेरिकेत टी व्हल्चर नावाच एक गिधाड आढळतं. या शिक्षा वैशिष्ट्य म्हणजे ते कुजलेल्या मांसाच्या वासावरून मेलेल्या प्राण्यांची कलेवरं शोर काढतं. या त्याच्या क्षमतेचा फायदा काळी गिधाड घेतात. तो टकी गिधाडांच्या राहतात. त्यामुळे त्यांनाही मेलेल्या प्राण्यावर ताव मारता येतो... अनेक प्रयोग केल्यावर असं लक्षात आलं आहे की, बुद्धिपेक्षा उपजत जाणीव किंवा सहजप्रेरणा (Instinct) हीच पक्ष्यांच्या सर्व व्यवहारांना नियंत्रित करणारी महत्त्वाची गोष आहे. याचा अर्थ नेहमीच्या प्रसंगापेक्षा एखादा वेगळा प्रसंग उद्भवला तर त्याला सामोरे
जाण्याची क्षमता पक्ष्यांमध्ये नसते. ते वेगवेगळ्या अडचणींवर मात करू शकत नाहीत तारवाली या पक्ष्याबाबत केलेल्या अभ्यासावरून असं लक्षात आलं की, त्याच्या घरट्याकडे येण्या-जाण्याच्या मार्गावर कृत्रिम अडथळा निर्माण केल्यास पक्षी गोंधळतो. अडथळ्या अवतीभवती भिरभिरतो. बाजूने पलीकडे जायचं हे त्याला समजत नाही.
कावळे, जे (Jays) आणि मॅगपाय (Magpie) हे झाडांवर राहणाऱ्या पक्ष्यांमधील सर्वांत बुद्धिमान आणि बदलत्या परिस्थितीशी पटकन जुळवून घेणारे पक्षी आहेत. स्वतः।
मिळवलेलं खाद्य लपवून ठेवणं आणि गरज पडेल तेव्हा खाणं, एखाद्या हॅवरसॅकमध्ये ठेवलेल्या खाद्यपदार्थांसाठी सॅकची चेन उघडणं अशा करामती कावळे सहज करतात.
नैसर्गिक अधिवासातील आफ्रिकन ग्रे पॅरट हा पोपट शेकडो इतर पक्ष्यांच्या आणि प्राण्यांच्या आवाजांच्या हुबेहूब नकला करू शकतो. त्याचा शब्दसंग्रह हा सुमारे चार वर्ष वयाच्या
मुलाच्या शब्दसंग्रहाएवढा समृद्ध असतो. दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीपासून आत पॅसिफिक महासागरातील गॅलपगाँस बेटांवर राहणारा 'वुडपेकर फिंच' नावाचा पक्षी खाद्य मिळवण्यासाठी एक युक्ती वापरतो. तो
वठलेल्या झाडांच्या खोडांमधून किड्यांच्या अळ्या किंवा पिल्लं बाहेर काढण्यासाठी निवडुंगाच्या काट्यांचा उपयोग करतो. किती लांबीच्या आणि जाडीच्या काट्याने कोणत्या
छिद्रातून भक्ष्य बाहेर काढता येतं हे त्याला अचूक माहीत असतं.
खूपच अप्रतिम माहिती भेटली... अशीच माहिती देतं रहा..
ReplyDelete